आठ दिवसांपूर्वी तुपेवाडी-काढणे येथील एका ७० वर्षीय वृद्धास त्रास होऊ लागल्याने, त्यांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची कोरोना तपासणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने, त्यांच्या संपर्कात आलेल्या अठरा जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. रविवारी उशिरा त्यांचे रिपोर्ट मिळाले. त्यामध्ये अकरा जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले.
याबाबतची माहिती तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी, डॉ.मंगेश खबाले यांनी दिली असून, आरोग्य विभागाकडून तुपेवाडी येथे सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील अकरा जण कोरोना बाधित आढळल्याने ग्रामस्थांसह आरोग्य विभागही हादरला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, ग्रामसेवक बी.एस. पवार आदींनी तुपेवाडी येथील परिस्थितीची पाहणी करून बाधितांना होम आयसोलोशन केले आहे.
फोटो : ०५केआरडी०४
कॅप्शन : तुपेवाडी-काढणे, ता.पाटण येथे एकाच कुटुंबातील अकरा जण बाधित आढळल्यानंतर, आरोग्य विभागाने तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.