कऱ्हाड : औद्योगिक विकासासाठी कारखानदारांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्याबाबत शासन विचाराधीन असून, महाराष्ट्र सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सातारा दौऱ्यावर आलेल्या ऊर्जामंत्र्यांनी कऱ्हाड येथे कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची भेट घेऊन कृष्णा कारखान्याच्या संचालकांशी आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी सहकारी साखर कारखान्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वीजदरात वाढ केल्याबद्दल डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते मंत्री बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एफआरपीप्रमाणे दर मिळावा यासाठी शासनाने वीजखरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात कारखानदारीच्या विकासासाठी स्वस्त दरात वीजपुरवठा करण्याचा विचार आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकारातून आलेली सार्वजनिक कामे पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य राहील.यावेळी ज्येष्ठ नेते भिमरावदादा पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन लिंबाजी पाटील, संचालक जगदीश जगताप, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, संजय पाटील, अमोल गुरव, सुजीत मोरे, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक जगदीश हरळीकर, विनायक भोसले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजकुमार पवार, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, महादेव पवार, प्रमोद पाटील, प्रमोद पाटील, अॅड. विजयकुमार पाटील, बाजार समितीचे संचालक दिपक जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, मलकापूरचे नगरसेवक हणमंतराव जाधव, बाळासाहेब घाडगे, भाजपचे विष्णू पाटसकर, व्ही. के. मोहिते, रेठरे बुद्रूकच्या सरपंच प्रविणा हिवरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कारखान्यांना स्वस्त दरात वीज विचाराधीन
By admin | Updated: March 5, 2016 00:06 IST