शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली

By प्रमोद सुकरे | Updated: February 17, 2024 17:48 IST

२३ फेब्रुवारीला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार

कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच कऱ्हाड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील १६, तर कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे.

कऱ्हाड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने बाबरमाची, जुजारवाड़ी, कालेटेक, कोळेवाडी, कोरीवळे, मुनावळे, नडशी, शिंगणवाडी, तुळसण, वनवासमाची (सदाशिवगड), विठोबाचीवाडी, पाचुपतेवाडी, नारायणवाडी, मसूर, राजमाची, पवारवाडी (नांदगाव), वडोली भिकेश्वर, वाण्याचीवाडी, धनकवडी, कचरेवाडी, माळवाडी, यादववाडी, संजयनगर (काले), मेरवेवाडी, कोर्टी, लोहारवाडी, कापील, डिचोली या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

२८ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी ९ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करून आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे.सध्या राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे कऱ्हाड तालुक्यातील वातावरणही चांगलेच तापले आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच उद्या विधानसभेचा वेध घेण्यासाठी राजकीय नेते कामाला लागले असून स्थानिक नेत्यांनाही भाव आल्याचे दिसत आहे.

ऐन उन्हाळ्यात वातावरण आणखी तापणारआरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्यास १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आता संपली आहे. आता २३ फेब्रुवारी रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामुळे या २८ गावांमध्ये सध्या निवडणूकपूर्व वातावरण सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकांमुळे उन्हाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे हे निश्चित.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकKaradकराड