शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

निवडणुकीचे रणशिंग; गुडघ्याला बाशिंग!

By admin | Updated: July 17, 2016 01:06 IST

मेढ्यात अनेकांची तयारी : ‘बाहेरून शह अन् आतून तह’वरच लक्ष्य; आजी-माजी सदस्यही रिंगणात उतरणार -- मेढा नगरपंचायत, मोर्चेबांधणी

आनंद गाडगीळ -- मेढा  जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले. अन् राजकीय चर्चेबरोबरच तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ४५०० लोकसंख्या प्रमाण मानून १७ सदस्य संख्या ठरली आहे. मेढा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांसह काही माजी सदस्यही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, निवडणुकीचे रणशिंग अन् गुडघ्याला बाशिंग बांधणारे बाहेरून शह आतून तह करणार काय? याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, भाजपा, आरपीआय समोरासमोर उभे ठाकणार का? या चर्चेने मात्र सध्या मेढा शहरात गरमागरम वातावरण आहे.मेढा शहरासह जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली निर्विवाद सत्ता, अंतर्गत गटाची धुसफूस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांच्यातील श्रेयवादावरून सुरू असलेले शीतयुद्ध अन् नगरपंचायतीच्या घोषणेपासून शिवसेना, भाजपा, आरपीआय यांनी सुरू केलेली मोर्चे बांधणी, माजी आमदार सदाशिव सपकाळ यांची गुलदस्त्यातील भूमिका या साऱ्या पार्श्वभूमीवर मेढा नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार असेच सध्याचे चित्र आहे. मेढा शहरासाठी असलेल्या १७ प्रभागांपैकी अपेक्षेप्रमाणे प्रभाग क्र. १, २ व ३ हे राखीव जागांसाठी आरक्षित झाले आहेत. या तीन प्रभागांमध्ये अंतर्गत चढाओढ असली तरीही आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार या तीनही प्रभागांत निवडणूक होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. तर उर्वरित १४ प्रभागांमध्ये चुरस राहणार असेच वाटते. मेढा नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना करताना गुगल मॅपिंगद्वारे व झिगझॅग पद्धतीने प्रभाग रचना केली असल्याने समोरासमोरचे मतदार आता एका प्रभागात दिसणार आहेत. मात्र, श्री गणेश मंदिर परिसरातील प्रभाग हे या पद्धतीने न केल्याने येथे हरकत घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच काही प्रभाग हे नेत्यांच्या सोयीचे झाल्याची चर्चा आहे.नगरपंचायतीच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत रंगलेला कलगीतुरा त्यातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांना दिलेला घरचा आहेर यामुळे वातावरण नक्कीच गढूळ झाले. मात्र, त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले अमित कदम यांच्या बरोबरचे मतभेद संपल्याचे जाहीर केले. मात्र, अमित कदम यांच्या अनुपस्थितीत आमदार भोसले यांनी मतभेद संपुष्टात आल्याचे जाहीर करणे, अन् त्याचबरोबर अंतर्गत धुसफूस न थांबल्यास स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची घोषणा करणे या दोन्ही घोषणा राष्ट्रवादीच्या गोटातील अस्वस्थता सांगतात, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मेढा शहरात पांडुरंग जवळ व चंद्रकांत देशमुख या जोडीचीच सत्ता राहिली आहे. सत्तेच्या चाव्या आपणाकडेच राहतील या पद्धतीने राजकारण केले. यावेळीही दोघे आज तरी हातात हात घालून आहेत.मेढा शहराच्या राजकारणात जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांनी आजपर्यंत कधीच लक्ष घातले नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, मेढा शहरात अमित कदम यांना मानणारा, माजी आमदार सदाशिव सपकाळ यांना मानणारा मतदार नक्कीच आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. मेढा शहरात असणाऱ्या १७ प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात सर्वसाधारणपणे २५० ते ३०० मतदार आहेत. त्यामुळे चुरस नक्कीच आहे. या दोघांबरोबरच राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असलेल्या मेढा शहरात शिवसेनेचाही मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, सध्या सेना-भाजप-आरपीआयची भूमिका शहाची राहणार की तहाची याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मेढा शहरात भाजपाची फार ताकद नसली तरीही भाजपाचा मतदार कासवाच्या गतीने वाढत आहे. आरपीआचे संजय गाडे यांनी तर सेना-भाजपाबरोबर महायुती करून लढण्याची भूमिका घेतली आहे. मेढा ग्रामपंचायतीच्या काळात तालुक्याचे ठिकाण असून देखील राहिलेल्या अनेक समस्या गावच्या अपेक्षेप्रमाणे न झालेला विकास, मेढा प्रादेशिक नळ योजनेच्या गैरकारभाराची चर्चा हे मुद्दे या निवडणुकीत राहणार असल्याचे सध्या चित्र आहे.राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धुसफूसएकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अंतर्गत असलेली धुसफूस. सेना, भाजपा, आरपीआयची रणनीती. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंची व्यूहनीती, अन् तळ्याच्या काठावर उभे असलेल्यांच्या भूमिकेवर मेढा नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार की एकमेकांच्या पायात पाय घालून पाडायला निघालेले हे सारेजण ‘सारे काही सत्तेसाठी’ असे म्हणत शहाचे तहात रूपांतर करणार हे ठरण्यास मात्र थोडा कालावधी जाणार असेच सध्याचे चित्र आहे. तरच चुरस वाढणार...सेनेचे संजय सपकाळ, सचिन करंजेकर, सचिन जवळ, प्रवीण पवार, भाजपाचे विठ्ठल देशपांडे, आरपीआयचे संजय गाडे राष्ट्रवादी समोर कसे उभे राहतात यावर निवडणुकीची चुरस ठरणार आहे.