शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मतदानादिवशीच जाहीर होणार निकाल !

By admin | Updated: March 6, 2015 23:43 IST

महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल : जिल्हा प्रशासन पन्नास ग्रामपंचायतींमध्ये राबविणार प्रयोग

सागर गुजर / साताराजिल्ह्यातील ८९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०१५ अखेर होणार आहेत. यापैकी ५० ग्रामपंचायतींमध्ये मतदानानंतर लगेचच स्थानिक पातळीवरच मतमोजणी करण्याचा वेगळा प्रयोग जिल्हा प्रशासन करणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर तो रोल मॉडेल म्हणून राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे हे या बैठकीला उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या या बैठकीत सहारिया यांनी सातारा व पुणे जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राज्यासाठी रोल मॉडेल ठरतील, असे नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. याच बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन राबविणार असणाऱ्या प्रयोगांचे प्रेझेंटेशन देण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल तालुक्याच्या ठिकाणी जाहीर करण्याची पद्धत आहे. ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमात निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात, याचे सविस्तर विश्लेषण नसले तरी निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी होणाऱ्या सूचनांनुसार निवडणुकांमध्ये प्रयोग केले जातात. आदल्या दिवशी मतदान व दुसऱ्या दिवशी मतमोजणी अशी पारंपरिक पद्धत आहे. त्यात नव्याने बदल करता येऊ शकतो का? याची चाचपणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण ८९३ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या डिसेंबरअखेर होणार आहे. यापैकी ७०२ ग्रामपंचायतींची निवडणूक एकाच दिवशी घेण्यात येणार असून, त्यामधील ५० ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करण्याचा प्रयोग जिल्हा प्रशासन राबविणार आहे. यासाठी निवडणूक काळात ज्या गावांमधील वातावरण पोषक असेल तिथे हा प्रयोग राबविता येईल. दरम्यान, कोणत्या गावांचा यात समावेश असणारा याची चाचपणी येत्या काही काळात केली जाणार आहे. निवडणुकीसाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम तालुक्यांच्या पातळीवर सुरू आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झोनल आॅफिसर नेमण्यात येणार आहेत. निवडणूक निरीक्षक म्हणून महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशा विविध उपाययोजनाही जिल्हा प्रशासन राबविणार आहे.