शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

फलटण पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 3:57 PM

phaltan Muncipal Corporation Satara- फलटण नगरपरिषदेच्या विविध विषय समिती व त्यांच्या सभापती निवडी मंगळवारी बिनविरोध पार पडल्या. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देफलटण पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोधनिवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या विविध विषय समिती व त्यांच्या सभापती निवडी मंगळवारी बिनविरोध पार पडल्या. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.फलटण नगरपालिकेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी मंगळवारी नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. या निवडी निवडणूक पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या उपस्थितीत पार पडल्या.यामध्ये स्थायी समितीच्या पदसिध्द अध्यक्षपदी नगराध्यक्षा नीता नेवसे, नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी नंदकुमार भोईटे यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांची सार्वजनिक बाधकाम समितीच्या सभापतिपदी, मधुबाला भोसले यांची पाणी पुरवठा व जलनि:सारण समिती सभापतिपदी, सनी अहिवळे यांची स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी, किशोरसिंह नाईक-निंबाळकर यांची शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतिपदी, रंजना कुंभार व दीपाली निंबाळकर यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी व उपसभापतिपदी निवडी जाहीर झाल्या आहेत. स्थायी समितीच्या सदस्यपदी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे, अशोकराव जाधव यांची निवड झाली.सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी अभिनंदन केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याहस्ते करण्यात आला. 

टॅग्स :phaltan-acफलटणMuncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर