शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कराड तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध!, अ‍ॅड.उदयसिंह पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

By प्रमोद सुकरे | Updated: November 3, 2022 17:42 IST

कऱ्हाड : कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ...

कऱ्हाड : कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जेवढ्या जागा तेवढेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून फक्त निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे. त्यामुळे अ‍ॅड.उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर संघाच्या सभासदांनी शिक्कामोर्तब केले असेच म्हणावे लागेल.माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांनी सन १९७४ साली या संस्थेची सत्ता पहिल्यांदाच आपल्या ताब्यात घेतली होती. त्यानंतर जवळजवळ ९ निवडणुका बिनविरोध पार पडल्या. आता विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर खरेदी विक्री संघाची ही पहिलीच निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार दि.२ नोव्हेंबर होती तर गुरुवारी दि.३ नोव्हेंबरला अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये सर्व अर्ज पात्र झाल्याने बिनविरोध निवडणूकचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संदिप जाधव काम पहात आहेत.दिवंगत विलासराव पाटील- उंडाळकर यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील काम पाहात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यावेळी पहिल्यांदाच खरेदी विक्री संघाची निवडणूक लढवली जात असून या निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाल्याने अँड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास दाखवल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे-  रंगराव थोरात (कार्वे), हणमंतराव चव्हाण (साजुर), उत्तम जगताप (वडगाव हवेली) बाजीराव पाटील( येळगाव), प्रताप कणसे (शेणोली), अनिल मोहिते (तळबीड), श्रीमंत काटकर (बेलदरे) कैलास साळवे (मुंढे), यशवंत डुबल (हजारमाची), जगन्नाथ मोरे (कापील), मच्छिंद्र बानुगडे( बानुगडेवाडी ),जगन्नाथ थोरात (कोर्टी), रंजना पाटील (कोळे), शालन जाधव (टाळगाव) दिलीप भिसे (सुर्ली), महेश पाटणकर (कासारशिरंबे), किसन चव्हाण (नवीन कवठे)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड