शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
3
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
5
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
6
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
7
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
8
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
9
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
10
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
11
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
12
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
13
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
14
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
15
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
16
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
17
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
18
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
19
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
20
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?

लोकसभेच्या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव, उमेदवारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:52 IST

दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले लोकसभेचे कुरुक्षेत्र मंगळवारी मतदानानंतर शांत झाले. लोकसभेच्या या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव सुरू असल्याचे पदोपदी जाणवले. आता कोण किती पाण्यात आहे, ते २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

ठळक मुद्देलोकसभेच्या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव. उमेदवारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक संभावित उमेदवारांचे भवितव्य पणाला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

सागर गुजर

सातारा : दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले लोकसभेचे कुरुक्षेत्र मंगळवारी मतदानानंतर शांत झाले. लोकसभेच्या या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव सुरू असल्याचे पदोपदी जाणवले. आता कोण किती पाण्यात आहे, ते २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.यंदाची निवडणूक ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची ठरली. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने जोरदार तयारी केलेली या निवडणुकीत पाहायला मिळाले. १९९९ च्या पराभवानंतर युतीने हा मतदारसंघ लढला. मात्र, युतीने जितकी ताकद यंदा लावली, तेवढी ताकद यापूर्वी अपवादानेच लावली होती.

यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला धक्का देण्याचे तंत्र भाजप-शिवसेनेने राबविले. युतीने अत्यंत विचार करून याठिकाणी उमेदवार दिला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दिवाकर रावते आदींच्या मोठ्या सभा सातारा मतदार संघात घेण्यात आल्या.लोकसभेची ही निवडणूक जिल्ह्यातील सर्वच आमदार व विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी रंगीत तालीमच ठरली. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, वाईचे आमदार मकरंद पाटील, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी खासदार उदयनराजेंसाठी शर्थीचे प्रयत्न केले.

शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पक्षाची जबाबदारी म्हणून नरेंद्र पाटील यांचे काम केले. तर विधानसभा निवडणुकीसाठी युतीचे संभावित उमेदवार समजले जाणारे महेश शिंदे (कोरेगाव), पुरुषोत्तम जाधव, मदन भोसले (वाई), मनोज घोरपडे (कऱ्हाड उत्तर), अतुल भोसले (कऱ्हाड दक्षिण), दीपक पवार (सातारा-जावळी) यांनी नरेंद्र पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी धावाधाव केली. पाटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे संभावित उमेदवार सत्यजित पाटणकर यांनीही खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाजूने आपली ताकद लावली.सर्वच उमेदवारांनी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युती अथवा आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी या उमेदवारांनी प्रयत्न केले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवरच या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.काही मतदार संघांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत. साहजिकच विधानसभा मतदार संघातील मतांच्या आकडेवारीला महत्त्व आहे. याचा अभ्यास करूनच विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याने संभावित विधानसभा उमेदवारांचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागले आहे.मुख्य लढत राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यातच होणार आहे. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनेही निकराची लढत दिली असल्याने ही आघाडी अधिक मते घेण्याची शक्यता आहे. आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्र्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर, सागर भिसे, अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांनी घेतलेले मतदान नेमके कुणाला फायद्याचे आणि कुणाच्या तोट्याचे, हे २३ मेनंतरच स्पष्ट होणार आहे.ऐनवेळीच घडलं-बिघडलंखासदार उदयनराजेंच्या उमेदवारीला सुरुवातीला पक्षांतर्गत विरोध झाला होता. बारामती, पुणे, मुंबईत अनेक बैठका झाल्या. शेवटी उदयनराजेंच्याच नावावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून सर्व आमदारांनी एकजुटीने उदयनराजेंचे काम केले.

दरम्यान, युतीतही अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला या मतदार संघातून दोनवेळा लढलेले पुरुषोत्तम जाधव यांना मातोश्रीवर बोलावून पुन्हा एकदा शिवबंधन धागा बांधला गेला होता. त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार, असे वातावरण असतानाच अचानकपणे भाजपचे नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी दिली गेली. ऐनवेळी घडतंय-बिघडतंय, असे चित्र सातारा लोकसभा मतदार संघात पाहायला मिळाले.वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा?गत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला होता. वाढलेला टक्का उदयनराजे भोसले यांच्यासाठी फायद्याचा ठरला होता, यंदाही चार टक्क्यांनी मतदान वाढले आहे, हे वाढलेले मतदान कुणासाठी पोषक ठरणार? याबाबत मतदार संघात जोरदार चर्चा सुरू आहे.

वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदार संघातून सर्वाधिक १ लाख ९९ हजार २५२ इतके मतदान झाले. त्या खालोखाल सातारा-जावळी मतदार संघातून १ लाख ९८ हजार १५५ मतदान झाले. कऱ्हाड दक्षिण व कऱ्हाड उत्तर या दोन मतदार संघातूनही मतदानाचा टक्का वाढला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसातारा