शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबांची जबाबदारी शिक्षण संस्थांनी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘केंद्र्र व राज्य शासनाच्या धोरणांना कंटाळलेला शेतकरी निराशाग्रस्त अवस्थेत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांची कुटुंबे कशी जगवायची? हा प्रश्न सध्या आहे. रयत शिक्षण संस्थेने या आत्महत्याग्रस्त शेतकºयांची मुले शिकविण्याचा विडा उचलला आहे. ही मुले आत्मविश्वासाने उभी राहावीत, यासाठी शिक्षण संस्थांनी जबाबदारी उचलणे गरजेचे आहे,’ असे मत ‘रयत’चे अध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘केंद्र्र व राज्य शासनाच्या धोरणांना कंटाळलेला शेतकरी निराशाग्रस्त अवस्थेत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांची कुटुंबे कशी जगवायची? हा प्रश्न सध्या आहे. रयत शिक्षण संस्थेने या आत्महत्याग्रस्त शेतकºयांची मुले शिकविण्याचा विडा उचलला आहे. ही मुले आत्मविश्वासाने उभी राहावीत, यासाठी शिक्षण संस्थांनी जबाबदारी उचलणे गरजेचे आहे,’ असे मत ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.रयत शिक्षण संस्थेच्या ९८व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी मंत्री आमदार पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, उद्योजक फरोख कूपर, रामशेठ ठाकूर, ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पतंगराव कदम म्हणाले, ‘देशात परिवर्तनाची चळवळ उभी राहत आहे, त्याची मशाल खासदार पवारांनी हाती घ्यावी. ही सार्वत्रिक जनभावना आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित समाजाला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवण्याचे काम आपल्या सर्वांना करायला लागणार आहे.’‘आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे मोठे काम आपल्याला करावे लागणार आहे,’ असे आवाहनही शरद पवार यांनी केले.