शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

शाळेच्या प्रत्येक वर्गात आरसा अन् गंध-पावडर

By admin | Updated: June 16, 2016 01:01 IST

कऱ्हाडची पालिका शाळा क्र. ९ झाली ‘हायटेक’ : डिजिटल क्लासरूमसह स्पर्धा परीक्षा केंद्रही; चिमुकल्यांसाठी ‘प्रोजेक्टर’ अन् ‘सीपीयू’

संजय पाटील --कऱ्हाड  शाळेचा पहिला दिवस हुरहुर लावणारा असला तरी शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्याला आईचा पदर सोडताना रडू आवरत नाही. दरवाजापर्यंत आलेला मुलगा शाळेत बसवून त्याला शिक्षणाची गोडी लावण्याचं काम शिक्षकांनाच करावं लागतं. कऱ्हाडच्या पालिका शाळा क्र. ९ मध्ये शिक्षकांनी ही जबाबदारी लिलया पेललीय. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि शाळेतच नव्हे तर वर्गातही ते रमावेत, यासाठी शाळेने विविध उपक्रम राबवलेत. या उपक्रमांमुळे येथील पटसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कऱ्हाड येथे मंगळवार पेठेतील ज्योतिबा मंदिरापासून काही अंतरावर पालिकेची ९ क्रमांकाची शाळा आहे. १९८१ मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली. नुकतीच या शाळेने ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. शाळेची इमारत जुनी असली तरी ती आकर्षक बनविण्यात आली आहे. रंगरंगोटीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सोयी-सुविधांचीही येथे उभारणी करण्यात आली आहे. शाळा बदलत असतानाच काही महिन्यांपूर्वी या शाळेला ‘आयएसओ’ मानांकनाचे वेध लागले. त्यानंतर सर्वचजण कामाला लागले. आपली शाळा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने मोलाचा वाटा उचलला. त्यातूनच शाळा खऱ्या अर्थाने घडत गेली. एकाच रंगाने रंगविलेल्या भिंती रंगीबेरंगी झाल्या. त्यावर सुविचार, चित्र रेखाटली गेली. छतावर तारांगण उमटलं. मैदान प्रशस्त आणि स्वच्छ झालं. प्रवेशद्वारात झेंडे फडफडू लागले. पायऱ्यांनाही रंग भरला. भिंती बोलक्या झाल्या. फळ्याभोवतीही आकर्षक रंगसंगती चढली; पण फक्त एवढ्यावरच न थांबता शिक्षकांनी प्रत्येक वर्ग सजवला. वर्गाच्या भिंतीवरही सुभाषिते रेखाटली गेली. बाराखडीपासून बोधकथांपर्यंत सर्वकाही भिंतींवरच उमटलं. ज्यामुळे या रंगीबेरंगी आणि दर्जात्मक शिक्षण देणाऱ्या शाळेकडे पालकांचा ओढा वाढला. सध्या या शाळेचा पटही पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी वाढला आहे. मात्र, पट वाढला आणि शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले म्हणून येथील शिक्षक थांबले नाहीत.तुमचीही शाळा येऊ शकते मालिकेत..सातारा जिल्हा ‘एज्युकेशन हब’ म्हणून महाराष्ट्रात ओळखला जाऊ लागलाय. आज मंत्रालयासारख्या उच्च विभागातही सर्वाधिक सातारकरच मोठ्या आत्मविश्वासाने काम करताना दिसतायत. भारताच्या बाहेरही ‘ग्लोबल सातारकर’ म्हणून मोठ्या कौतुकानं ओळखली जाणारी मंडळी तयार झाली ती इथल्या शाळेतच. म्हणूनच अशा शाळांमधील वेगळ्या उपक्रमाला सलाम करण्यासाठी ‘लोकमत’नं सुरू केलीय ही नवी मालिका... तुमच्याही शाळेत काही वेगळे उपक्रम राबविले जात असतील तर उचला मोबाईल अन् करा कॉल. संपर्क : 9850 384 376आजचा राजकुमार... ...आजची राजकुमारी!दैनंदिन स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘आजचा राजकुमार’, ‘आजची राजकुमारी’ उपक्रम. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास वाव मिळावा, यासाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धा.औषधी वनस्पतींची माहिती व्हावी, यासाठी पर्यावरण मित्र शाळा उपक्रम.विद्यार्थ्यांना वेळेत शाळेमध्ये येण्याची सवय लागावी, यासाठी उपस्थिती ध्वज उपक्रम. इयत्ता दुसरीपासून विद्यार्थ्यांना स्वत:हून प्रयोग करता यावेत, यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा. शाळा व परिसर सुशोभित करण्याबरोबरच गुणवत्ता वाढविसाठी आमचा प्रयत्न आहे. शाळेला आयएसओ मानांकन मिळवून देण्यात येथील शिक्षक, पालक व नागरिकांचा हातभार आहे.- अरविंद पाटील, मुख्याध्यापक वर्गात पंखा अन् खिडक्यांना पडदे...विद्यार्थी वर्गामध्ये रमावेत, यासाठी प्रत्येक वर्ग सजविण्यात आला आहे. तसेच प्रत्येक वर्गात आरसा, गंध, टिकली, पावडर, कंगवा, नेलकटर आदींची सोय करण्यात आली आहे. या आरशात पाहताना चिमुकली अक्षरश: हरखून जातात. त्याचबरोबर वर्गामध्ये वीजबल्ब, पंखा व खिडक्यांना आकर्षक पडदेही बसविण्यात आले आहेत.