शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा झेडपीचे ३५ वे सीईओ ज्ञानेश्वर खिलारी; पदभार आज स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 21:03 IST

विनय गौडा चंद्रपूरचे जिल्हाधिकारी 

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पदोन्नतीने बदली झाली असून ते चंद्रपूरचे जिल्हाधिकारी होणार आहेत. तर सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ज्ञानेश्वर खिलारी यांची नियुक्ती झाली आहे. ते ३५ वे सीईओ म्हणून गुरुवारीच पदभार स्वीकारतील असे सांगण्यात आले. 

सातारा जिल्हा परिषदेने विविध अभियान, उपक्रमात राज्य तसेच देशपातळीवर नावलौकिक केला आहे. या पाठीमागे पदाधिकाºयांबरोबरच अधिकाºयांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. आतापर्यंतच्या सर्वच मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्याच्या योगदानात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा नावलौकीक वाढेल असेच काम केले. त्यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. शुक्रवारी ते चंद्रपूरचा पदभार स्वीकारणार आहेत. तर  गौडा यांच्या जागी ज्ञानेश्वर खिलारी यांची नियुक्ती झाली आहे. 

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील मंगरुळ पारगाव या गावचे ज्ञानेश्वर खिलारी हे रहिवाशी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतून ते राज्यसेवेत आले. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. महसूलमध्ये त्यांचे काम चांगले राहिले आहेत. एक मनमिळावू अधिकारी म्हणून ते परिचीत आहेत. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते पुणे येथे सह नोंदणी महानिरीक्षक या पदावर होते. नूतन सीईओ खिलारी हे गुरुवारीच पदभार घेतील असे सांगण्यात आले.विनय गौडा कर्नाटकातील... 

२०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी विनय गौडा हे कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे गाव मद्दुर तालुक्यातील गुरूनल्ली आहे. त्यांनी साताºयापूर्वी नाशिक येथे प्रोबेशनरी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आणि त्यानंतर ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.  त्यानंतर त्यांची याच पदावर सातारा जिल्हा परिषदेत बदली झाली होती. 

हाफ फोटो दोन...

१२सातारा ज्ञानेश्वर खिलारी सीईओ १२सातारा विनय गौडा सीईओ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर