शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोठडी काळात काहीही जप्त नाही ‘सुरुचि’ धुमश्चक्रीप्रकरण : बचाव पक्षाचा युक्तिवाद; खासदार गटाच्या अर्जावर आज सरकार पक्षाची बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:44 IST

सातारा : ‘खासदार गटाच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पोलिस कोठडीत असताना त्यांच्याकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. तसेच या प्रकरणात काहीही सहभाग नसल्याने त्यांचा जामीन अर्ज मंजूर

सातारा : ‘खासदार गटाच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पोलिस कोठडीत असताना त्यांच्याकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. तसेच या प्रकरणात काहीही सहभाग नसल्याने त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार आहे.

येथील ‘सुरुचि बंगल्यावर सुमारे अडीच महिन्यांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात जोरदार धुमश्चक्री उडाली होती. त्यावेळी वाहनांची तोडफोड करण्यात येऊन काहीजण जखमी झाले होते. याप्रकरणी खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.या प्रकरणात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. आमदार गटाच्या काही कार्यकर्त्यांचा उच्च न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. तर खासदार गटाच्या कार्यकर्त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी बाळासाहेब ढेकणे, विक्रम शेंडे, इम्तियाज बागवान, विशाल ढाणे, केदार राजेशिर्के, शेखर चव्हाण यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.

संशयिताचे वकील अ‍ॅड. ताहीर मणेर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पोलिस आणि विक्रम पवार या दोघांच्याही फिर्यादीत संशयितांची नावे नाहीत. तथाकथित गोळीबार झालेला आहे. त्यात कोणीही जखमी झालेले नाही. तसेच ही घटना घडली त्यावेळी संशयित त्या ठिकाणी नव्हते. सीसीटीव्हीतही ते कोठे दिसून येत नाहीत. घटना घडली त्यावेळी संशयित जागेवर नव्हते. असते तर ते पळून गेले असते. या घटनेत त्यांचा कसलाही सहभाग नाही. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा.दरम्यान, यावेळी श्रीकांत हुटगीकर यांनीही संशयित अनिकेत आबनावे, सुमित पवार आदींच्या जामीन अर्जावर युक्तिवाद केला. मंगळवारी सरकार पक्ष आपला युक्तीवाद करणार आहे.अमोल मोहितेंच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण...आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे नगरसेवक अमोल मोहिते यांनीही न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. संग्राम मुंढेकर यांनी युक्तिवाद केला. मोहिते यांचा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही. त्यांच्यावर लावलेली कलमे चुकीची आहेत. फिर्यादीतही मोहिते यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळावा, असा युक्तिवाद केला. यावर मंगळवारी सरकार पक्ष आपली बाजू मांडणार आहे.