शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या आणखी एका नेत्याचा प्रताप; सभागृहात राष्ट्रगीत सुरु असताना केली शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:22 IST

राष्ट्रगीताला प्रारंभ होताच पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक उभे राहिले. मात्र, भाजपचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

लोणंद (सातारा) : नगरपंचायतीच्या सभेत राष्ट्रगीत सुरू असताना सर्व पदाधिकाऱ्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रताप भाजपच्या उपनगराध्यक्षांनी घडविला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात मासिक सभा बुधवार, दि. २१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक विषयांवरून वादळी चर्चा सुरू झाली. आपण दाखल केलेल्या ठरावांचे वाचन होत नाही, असा आरोप करत उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी मुख्याधिकारी अभिजित परदेशी यांना धारेवर धरले. दरम्यान, सभा संपल्याचे जाहीर करत नगराध्यक्षा स्नेहलता शेळके यांनी राष्ट्रगीत सुरू करण्याची सूचना केली. राष्ट्रगीताला प्रारंभ होताच पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक उभे राहिले. मात्र, भाजपचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिला नगराध्यक्षा शेळके अन् मुख्याधिकारी परदेशी यांच्यासह सभागृहाला शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी त्यांचे सहकारी टेबलही वाजवत होते. मात्र, राष्ट्रगीत सुरू असल्याने सर्वजण मान खाली घालून शांतपणे उभे होते. दरम्यान, सभागृहाच्या कामकाजाचे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्यात हे दृश्य चित्रबद्ध झाले.

ही चित्रफीत आता बाहेर पडली असून, या शिवीगाळीवरून सोशल मीडियावर अत्यंत संतापाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लोणंद नगरपंचायतीत सतरांपैकी राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक होते. भाजपच्या दोन नगरसेवकांना सोबत घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी सत्ता स्थापन केली. मात्र, स्थानिक नेते आनंदराव शेळके-पाटील यांनी आपल्या तीन नगरसेवकांना घेऊन काँग्रेससोबत पंचायतीचा कारभार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचा उपनगराध्यक्ष असूनही भाजपला सत्तेत स्थान मिळत नाही याचा राग उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके यांनी काढला असला तरी राष्ट्रगीत सुरू असताना एका महिला नगराध्यक्षाला अश्लील शिवीगाळ करावी काय, असा सवाल लोणंदकरांमधून विचारला जात आहे. 

टॅग्स :BJPभाजपाNational Anthemराष्ट्रगीत