शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

उसाचे पीक ठरले दुहेरी संकट

By admin | Updated: July 27, 2015 00:22 IST

पाटण तालुक्यातील व्यथा : बाहेरील कारखान्यांनी बिले दिली नाहीत

अरूण पवार - पाटण -पाटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षी उसाचे पीक म्हणजे महासंकटच ठरल्यात जमा आहे. कारण, ऊस वाळून जाऊ लागला म्हणून तालुक्याबाहेरील कारखान्यांना ऊस घालण्यात आला. त्या कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना बिल दिलेले नाही. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील देसाई कारखाना विक्रमी ऊस नोंदणीमुळे यावर्षी १ जूनपर्यंत चालला. दुसरीकडे रक्ताचे पाणी करून शेतात वाढविलेला ऊस वाळून जाऊ लागला. त्यामुळे हवाल्दिल झालेल्या तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बाहेरच्या साखर कारखान्यांना ऊस घातला. तरीसुद्धा शेवटी व्हायचं तेच झालं. अजूनही बाहेरच्या कारखान्यांनी पाटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. केवळ १२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असणारा पाटण तालुक्यातील साखर कारखाना. त्यामानाने २५०० ते ५००० हजार मेट्रिक टन गाळपाची क्षमता असणारे कारखाने शेजारच्या तालुक्यात आहेत. त्यातच यावर्षी उसाचे उत्पादन अधिक झाले. त्यामुळे सर्वच कारखान्यांवर ऊस गाळपाचा भार आला. त्यातच पाटण तालुक्याचं राजकारण देखील ऊस आणि साखरेवरच बऱ्यापैकी अवलंबून आहे. त्यामुळे यावेळेस अनेक ऊस उत्पादकांची चांगलीच अडचण झाली. शेतकऱ्यांनी ऊस कऱ्हाड, वाळवा, सांगलीच्या कारखान्यांना घातला. अनेक शेतकऱ्यांनी १० ते ५० टनांपर्यंत ऊस बाहेर घातला आहे. मात्र बिले मिळाली नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांवर विचार करण्याची वेळ आली आहे. अहोरात्र कष्ट करुन उसाचे पीक वाढवले होते. खते, पाणी देताना व मशागत करताना तहानभूक विसरून काम केले. ऊस वाळून जाऊ लागला म्हणून बाहेरील कारखान्यास घातला. त्याचे बील अद्याप मिळालेले नाही. - मारुतराव बाचल, ढेबेवाडीबिलासाठी मारावे लागतात हेलपाटे...पाटण तालुक्यात साखर कारखाना आहे. मात्र आमचा ऊस नेण्यास विलंब झाल्यामुळे तो वाळून जात होता. त्यासाठी बाहेरच्या कारखान्यांना यावर्षी ऊस घालावा लागला. आता मात्र उसाच्या या बिलासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. उसाची बिले न मिळाल्याने आमच्यावर दुहेरी संकट आले आहे. यामधून मार्ग कसा काढावा हेच समजत नाही. काही महिन्यांवर गाळप हंगाम आला असतानाही ही परिस्थिती आहे, तुम्हीच आता याला वाचा फोडा, असे शेतकरी सांगत आहेत.