शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सेविकांच्या मनमानीमुळे आरोग्य उपकेंद्र सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 17:01 IST

पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील पाडळोशी येथील आरोग्य उपकेंद्र सध्या चर्चेचा विषय ठरू पाहत आहे. या आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका गाव व परिसरातील रुग्णांना आरोग्याच्या सुविधा देत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील जनतेची आरोग्य सेवाच सलाईनवर असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देपाडळोशीतील स्थिती ग्रामस्थांना मिळेनात आरोग्य सुविधा आरोग्याच्या सुविधा देत नसल्याच्या तक्रारीत वाढ

चाफळ (जि. सातारा) : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील पाडळोशी येथील आरोग्य उपकेंद्र सध्या चर्चेचा विषय ठरू पाहत आहे. या आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका गाव व परिसरातील रुग्णांना आरोग्याच्या सुविधा देत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील जनतेची आरोग्य सेवाच सलाईनवर असल्याचे चित्र आहे. 

चाफळपासून दहा किलोमीटर अंतरावर पाडळोशी गाव आहे. याठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रांतर्गत असणाºया या उपकेंद्रात पाडळोशी, नारळवाडी, मसुगडेवाडी, मुसळेवाडी, पाठवडे, बाटेवाडी, सडावाघापूर, सडाकळकी, सडानिनाई, सडादाढोली, धायटी, कांबळेवाडी, खुडेवाडी आदी गावांचा समावेश आहे. पोलिओ लसीकरण वगळता येथील सेविका कित्तेक दिवस या गावांकडे फिरकत नाही.

सध्या स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकन गुनिया यासारख्या आजारांनी सगळीकडे थैमान घातले असताना ही सेविका उपकेंद्र्र सोडण्यास तयार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित सेविकेने लसीकरणासह दर महिन्याला प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन तपासणी  करावयाची असते. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे आरोग्य उपकेंद्रात सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश वेळा सेविका उपकेंद्रात हजरच नसतात. आणि असल्याच तर रुग्णांना पुरेशी औषधे उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत उपचाराविना परत पाठविले जाते.

शासनाने ग्रामीण भागामध्ये बाल व माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच सुरक्षित प्रसूती होण्यासाठी लाखो रुपये खर्चून उपकेंद्रांची निर्मिती केली आहे. यात प्रसूती खोलीही बांधण्यात येऊन पुरेशी औषध सामग्री पुरविलेली आहे. मात्र, या उपकेंद्रात प्रसूतीच केली जात नाही. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. पाडळोशी येथील ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर त्या सेविकांना मी दवाखान्यात बोलावून समज दिली होती. कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. संबंधित सेविका कामकाजात सुधारणा करत नसेल तर याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून चौकशीअंती योग्य ती कारवाई आरोग्य खात्यामार्फत करण्यात येईल. ग्रामस्थांनी सेविकेबाबत लेखी तक्रार दिल्यास कारवाई करणे सोईचे ठरेल.- डॉ. महेश पाटील, वैद्यकीय अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्र, चाफळ