शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:54 IST

कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती.

ठळक मुद्देसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणीधरणातील आवकचे प्रमाण ३१४२ क्युसेक

सातारा : कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती.जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्याने प्रमुख सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात आले. सध्या पावसाने उघडीप दिली असलीतरी धरणात पाण्याची आवक होत आहे.कोयना धरणही यावर्षी गतवर्षीपेक्षा लवकर भरले. १०४ टीएमसीच्यावर धरणातील पाणीसाठा गेला होता.

सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. २१ सप्टेंबरला धरणात १०१.२४ टीएमसी पाणीसाठा होता. तो सोमवारी सकाळपर्यंत १००.३८ टीएमसीवर आला.

सध्या धरण परिसरात पाऊस नसल्याने आवक कमी झाली आहे. कोयना धरण परिसरात यावर्षी आतापर्यंत ५२९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे एकूण ५९१२ आणि महाबळेश्वर येथे ५०९४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर