शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

संतोषला धक्काबुक्की होण्याच्या शक्यतेमुळे गावात प्रचंड बंदोबस्त

By admin | Updated: August 20, 2016 01:00 IST

पोलिसांकडून खबरदारी : लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणे काहीजण तयारीत

वाई : गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रभर गाजणाऱ्या वाई हत्याकांड प्रकरणातील आरोपी संतोष पोळ याच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याचवेळी दुसरीकडे स्टंटबाजी करुन लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीजण संतोषला धक्काबुक्की करण्याच्या तयारीत असल्याची कुणकूण लागताच पोलिसांनी शुक्रवारी धोम गावात प्रचंड बंदोबस्त ठेवला.धोम धरण परिसरात वनिताचा मृतदेह सापडणार, याची चर्चा सुरु झाल्यानंतर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सकाळपासूनच वाई पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. मात्र, संतोषला नेमके कुठे ठेवले आहे, हे शेवटपर्यंत पोलिसांनी कुणाला समजू दिले नाही. आवारातील काही खोल्यांमध्ये पत्रकारांना मज्जाव करण्यात पोलिस निरीक्षक विनायक वेताळ हेच उलट अग्रेसर होते. गेले सहा दिवस प्रसारमाध्यमातून झळकणारे पोलिस अधिकारी आज पत्रकारांपासून एवढे फटकून का वागू लागले, याचा शोध घेतला असता संतोषच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी आपली भूमिका बदलल्याची माहिती समजली. (प्रतिनिधी)पोलिसांना भीती नेमकी कुणाची ?पोलिस ठाण्यात गर्दी होऊ लागली, तसे तोंडाला काळे फडके बांधलेल्या संतोषला जीपमध्ये बसवून मागच्या मागेच धोममध्ये नेण्यात आले. तेथेही खड्डा खणताना प्रसार माध्यमांना बिल्कूल जवळ येऊ दिले नाही. आजूबाजूच्या घरांच्या खिडक्याही झाकण्यात पोलिसांनी धन्यता मानली.