शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांमुळेच शेतकरी योजनांपासून वंचित

By admin | Updated: December 27, 2015 00:09 IST

जावळी पंचायत समिती सभा : कृषी योजनांचा पाठपुरावा करत नसल्याचा सदस्यांचा आरोप

मेढा : जावळी तालुक्यात कृषी विभागाचे अधिकारी शासनाच्या योजनाबाबत पाठपुरावा करीत नसल्याने शेतकरी योजनेपासून वंचित राहत असल्याची टीका जावळी पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य मोहनराव शिंदे यांनी केली. यावेळी मासिक बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी वारंवार बोलावून देखील हजर राहत नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जावळी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुहास गिरी यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आखाडकर सभागृहात झाली. यावेळी उपसभापती निर्मला कासुर्डे, सदस्य मोहनराव शिंदे, हणमंतराव पार्टे, रूपाली वारागडे, गटविकास अधिकारी गजानन भोसले उपस्थित होते. तालुक्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. योजनेतील साहित्य शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा आरोप सदस्य मोहनराव शिंदे यांनी केला. गेल्या वर्षभरात तालुक्यात पाईप आलेच नाहीत. याबाबत खुलासा करा, असे म्हणत कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर सदस्य हणमंतराव पार्टे यांनीही जिल्ह्यात इतर तालुक्यांत पाईप येतात अन् जावळीतच का नाही? याबाबत कृषी अधिकाऱ्यांना मी जिल्हा परिषदेत घेऊन जातो व वस्तुस्थिती दाखवितो, असे सांगितले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा झालाच नाही. (प्रतिनिधी) निधीअभावी कामे रखडली तालुक्यात महू-हातगेघर धरणातील पाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लेखी आदेश असल्याशिवाय सोडू नका, अशी मागणी सदस्यांनी केली. बांधकाम विभागाची अनेक कामे, अनेक गावांचे रस्त्याची कामे रखडली असून, तालुक्यातील एकीव ते रुंद रस्त्याचे काम निधीअभावी रखडल्याचे सदस्या रूपाली वारागडे यांनी सांगितले. तसेच हुमगाव ते बावधन या रस्त्याबाबतही कार्यवाही व्हावी, अशी आग्रही मागणी सभापती सुहास गिरी यांनी केली. सर्वपक्षीय रास्ता रोको पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाबाबत संबंधित अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे या योजनेची कामेच कळत नसल्याने याबाबत सर्वपक्षीय रास्ता रोको करणार असल्याचा इशारा मोहनराव शिंदे यांनी दिला. तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून, वन विभागाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी उपसभापती निर्मला कासुर्डे यांनी केली. सभागृहात ‘जामर’ हवाच मासिक सभेच्या वेळी अधिकारी अन् सदस्य मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप किंवा गेम खेळण्यात मश्गुल असतात. आज एक सदस्य मोबाइल पाहण्यात दंग असल्याचा अनुभव आला. याबाबत सभागृहात ‘जामर सिस्टिम’ असावी अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.