शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामच्या दुर्लक्षामुळे रस्त्याला कुबाड, रहिमतपूर-सातारा रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:47 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे.

ठळक मुद्देबांधकामच्या दुर्लक्षामुळे रस्त्याला कुबाडवाहनधारकांची कसरत : रहिमतपूर-सातारा रस्त्याची चाळण

रहिमतपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिमतपूर-सातारा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यात भरलेली खडी पुन्हा रस्त्यावर पसरली आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रहिमतपूर-सायगाव दरम्यानच्या रस्त्यावर डांबर, खडी, माती गोळा होऊन रस्त्यावरच टेमकी उभी राहिली आहे. एकप्रकारे बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याला कुबाड आले आहे. अशा रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.रहिमतपूर-सातारा रस्त्यावरून दररोज विविध प्रकारच्या हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. गेल्या अनेक वर्षांपासून रहिमतपूर ते सातारा या २८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण केलेले नाही. राज्यात व केंद्रात कुठल्याही पक्षाची सत्ता असली तरी प्रत्येकवेळी जागोजागी एक-दोन किलोमीटर अंतराच्या तुकडीकरणात खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले.

एक-दोन वर्षांआड तुकडीकरणात होणाऱ्या डांबरीकरणामुळे अगोदर झालेल्या डांबरी रस्त्याची वाट लागलेली असते. निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाच्या कामकाजामुळे नवा कोरा रस्ता दोन पावसाळेही व्यवस्थित काढत नाही. एका पावसातच खड्ड्यांतील व रस्त्याची खडी बाहेर निघते. सध्या या रस्त्याची विदारक अवस्था झाली आहे. प्रचंड खड्डे तेही फुटाफुटाचे पडले आहेत.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर