शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विकासात दुजाभाव न ठेवल्यामुळेच कामे मार्गी : राजाभाऊ बर्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:43 IST

कोरेगाव : ‘शहराला विकासकामांद्वारे नवी ओळख मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

ठळक मुद्देकोरेगावात विविध विकासकामांचे उद्घाटन; डांबरीकरण अन् खडीकरणाला प्राधान्य

कोरेगाव : ‘शहराला विकासकामांद्वारे नवी ओळख मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. जनतेसह नगरसेवकांमध्ये कसलाही दुजाभाव न ठेवता सर्वांना बरोबर घेत विकासाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवला आहे,’ असे प्रतिपादन नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी केले.प्रभाग क्र. ११ व १३ मधील केदारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग क्र. ४ मधील एकंबे रस्त्यानजीकच्या कॉलनीतील रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व प्रभाग क्र. ५ व ६ मधील शांतीनगर गॅस आॅफिस रस्त्याचे डांबरीकरणाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बर्गे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय पिसाळ, विरोधी पक्षनेते महेश बर्गे, नगरसेवक बच्चुशेठ ओसवाल, नागेश कांबळे, नगरसेविका साक्षी बर्गे, पूनम मेरुकर यांची प्रमुख उपस्थिती होती.बर्गे पुढे म्हणाले, ‘विकासकामे करत असताना नागरिकांच्या सूचना व नगरसेवकांनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवली आहे. शहरातील सर्व प्रभाग विकासाच्या प्रवाहात आणून या शहराला एक नवी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली असून, निधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध केला जात आहे. सर्वांच्या बरोबरीने शहराच्या विकासाचा वेग वाढता ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.जयवंत पवार म्हणाले, ‘पदाधिकारी, नगरसेवकांबरोबरच कर्मचाºयांचेही योगदान मोठे असून, सर्वांच्यात एकीची भावना निर्माण करण्याचे काम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे.शहरात विकासकामे हाती घेतल्यामुळे नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. ऐन उन्हाळ्यातसुद्धा सुरळीत पाणी पुरवठा करण्यात नगरपंचायत यशस्वी झाली आहे.’संतोष नलावडे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. बापूसाहेब जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. संजय क्षीरसागर, डॉ. राजन काळोखे, साहेबराव बर्गे, जगन्नाथ बर्गे, अ‍ॅड. एकनाथ शिंदे, यज्ञेश्वर मांढरे, नवनाथ बर्गे, सुनील बर्गे, राहुल बर्गे, संतोष कोकरे, दीपक फडतरे, महादेव जाधव, गणेश येवले, अमोल मेरुकर, मुस्ताक खान यांच्यासह नागरिक उपस्थित होते.कोरेगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी राजाभाऊ बर्गे, जयवंत पवार, संजय पिसाळ, बच्चूशेठ ओसवाल, महेश बर्गे, सुनील बर्गे, नवनाथ बर्गे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा