शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवामुळे माणदेशच्या महिलांचा वाढला रुबाब : चेतना सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:50 IST

सातारा : ‘माणच्या मातीत महिला भगिनी कष्टाने वस्तू बनवतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा व त्यांची कला चिरंतर टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत

ठळक मुद्देअभिनेत्री अमृता सुभाषच्या हस्ते माणदेशी महोत्सवाचे उद्घाटनत्या मंत्री, कलाकार, अधिकाºयांशी आत्मविश्वासाने बोलतात,बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन, शिबिरे होणार

सातारा : ‘माणच्या मातीत महिला भगिनी कष्टाने वस्तू बनवतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा व त्यांची कला चिरंतर टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. माणदेशी महोत्सवामुळे माणच्या महिलांचा रुबाब वाढला आहे, त्या मंत्री, कलाकार, अधिकाºयांशी आत्मविश्वासाने बोलतात,’ असे प्रतिपादन माणदेशी फांउडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले.

गुरुवार, दि. २३ ते सोमवार, दि. २७ नोव्हेंबर या कालावधीत येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या डीआरडीए विभागाचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, ज्योतिर्मय फांउडेशनच्या सुवर्णा पाटील उपस्थित होते. यावेळी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

घोंगडी बनविणे, जाती, कुंभारकाम अशी कष्टाची कामे माणदेशातल्या महिला करतात. त्यांच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ नव्हती. साहजिकच त्यांची पुढची पिढी या व्यवसायापासू दूर जाऊन मजुरी करण्यावर भर देऊ लागली, हे लक्षात आल्यावर आम्ही ही कला जपली पाहिजे, यासाठी सर्व महिलांना एकत्रित करून हा उद्योग करीत आहोत, असेही सिन्हा म्हणाल्या.

दरम्यान, यशस्वी देशी उद्योजिकांच्या यशोगाथा व त्यांचे वास्तव अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकण्याची अपूर्व संधी २५ नोव्हेंबर रोजी सांयकाळी चार वाजता माणदेशी उद्योजिका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. सिनेअभिनेत्री निवेदिता सराफ या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील १७ माणदेशी उद्योजिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी २०० मुलींना मोफत सायकल वाटप केले जाणार आहे.२६ नोव्हेंबर रोजी दुर्गेश नंदिनी प्रस्तुत ‘गजर महाराष्ट्राचा’ हा लोककला व लावणीचा कार्यक्रम होणार आहे. सातारा जिल्हा परिषद व माणदेशी फांउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन, शिबिरे होणार आहेत.अन् भारावली अमृता!तवे, जाती विकणाºया महिलेचा मार्केटिंग स्कील पाहून अभिनेत्री अमृता सुभाष भलतीच भारावली होती. आमच्या कढईत आमटी बनवली तर आरोग्य सुधारते, शरीरातील लोहाचे घटक वाढतात, असे ही महिला सांगत होती. उपस्थित सर्वजण शांतपणे या माणदेशी वृद्ध महिला सांगत असलेली माहिती ऐकत होते.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर