शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
3
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
4
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
5
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
6
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
7
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
8
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
9
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
10
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
11
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
12
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
13
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
14
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
15
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
16
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
17
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
18
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
20
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण

अवकाळीमुळं ज्वारी भुईसपाट, सातारा जिल्ह्यात नुकसान : द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:57 IST

सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे या पावसाचा काहींना लाभ झाला असला तरी आगाप ज्वारीची पिके मात्र या वादळी पाऊसाने भुईसपाट केलीअगोदर सोयाबीन, घेवडा पीक दराअभावी धोक्यात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला

सातारा / वाठार स्टेशन : विजांचा कडकडाट अन् वादळी वाºयासह बराच वेळ पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ज्वारीसह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ज्वारीचे उभे पिक भुईसपाट झाले.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी भागात सोनके, करंजखोप, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, देऊर, तडवळे (संमत) वाघोली या गावांत गेली दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा काहींना लाभ झाला असला तरी आगाप ज्वारीची पिके मात्र या वादळी पाऊसाने भुईसपाट केली आहेत.

अगोदर सोयाबीन, घेवडा पीक दराअभावी धोक्यात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, यातच हाता तोंडाला आलेली ज्वारी ही भुईसपाट झाल्याने ज्वारीचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे डोक्याला हात लावून बसण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. शासनाने याबाबत नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांमधून जोर धरू लागली आहेबागायतदार पावसाने अडचणीतकलेढोण परिसरातील विखळे, पाचवड, गारळेवाडी व गारुडी भागामध्ये हजारो एकर द्राक्ष बागांचे क्षेत्र आहे. बुधवारी सायंकाळी या भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाच्या सरी पडल्या त्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षांचे मनी धरण्याची स्टेज आहे. तर काही बागांमध्ये मनी धरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशावेळी हा पाऊस झाल्यामुळे द्राक्ष पिकाबरोबरच द्राक्ष बागायतदार अडचणीत आले आहेत.कलेढोण भागाला पावसाचा तडाखाकलेढोण, ता. खटाव परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, या पावसामुळे मनी धरण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्ष पिकाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या पावसामुळे दावण्या व भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.

 

या अवकाळी पावसामुळे द्र्राक्षावर परिणाम होणार आहे. दावण्या व भुरीचा रोग होण्याचे वातावरण या अवकाळीने निर्माण झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले द्राक्ष पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.- कृष्णा शिंदे, द्राक्ष बागायतदार, कलेढोणतडवळे (संमत)वाघोली गावात काल झालेल्या मुसळधार पावसाने ज्वारी पीक भुईसपाट झाले आहे. याबाबत शेतकºयांना नुकसान भरपाई मिळून कृषी विभागाने ज्वारीच्या पिकाचे पंचनामे करून शासनाला सादर करावेत.- कमलाकर भोईटे, तडवळे