शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या घाटामुळे कास पठाराची फुलं अनिश्चित काळापर्यंत दुर्मिळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 11:39 IST

कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात रस्ता खचल्यामुळे अनिश्चित काळापर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला आहे. केवळ पठारावर राहणाऱ्या स्थानिक दुचाकीस्वारांना वगळता कोणत्याही वाहनचालकाला यापुढे 'कास'कडे प्रवेश नाही. दरम्यान सुटीनिमित्त कास पठारावर रविवारी मुक्कामाला गेलेल्या पर्यटकांना एकीव -कुसुंबी-मेढामार्गे खाली सोडण्यात येत आहे.

ठळक मुद्देकास पठारावर रविवारी मुक्कामाला असलेले पर्यटक एकीव -कुसुंबी-मेढामार्गे खालीस्थानिक दुचाकीस्वार वगळता कोणत्याही वाहनचालकाला यापुढे 'कास'कडे प्रवेश नाही.डोंगराची भिंत जेसीबीने खणून काढून रस्ता अधिक रुंद करण्याची मोहीम हाती

 

सातारा : कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात सोमवारी पहाटे रस्ता खचल्यामुळे अनिश्चित काळापर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला आहे. केवळ पठारावर राहणाऱ्या स्थानिक दुचाकीस्वारांना वगळता कोणत्याही वाहनचालकाला यापुढे 'कास'कडे प्रवेश नाही. दरम्यान सुटीनिमित्त कास पठारावर रविवारी मुक्कामाला गेलेल्या पर्यटकांना एकीव -कुसुंबी-मेढामार्गे खाली सोडण्यात येत आहे. शनिवार रविवारला जोडून गांधी जयंती दिनाची सुट्टी आल्यामुळे हजारो पर्यटक सध्या कास पठारावर आहेत. पुण्या-मुंबईकडूनही हजारो पर्यटक साताऱ्याहून 'कास'कडे निघाले होते. मात्र सोमवारी पहाटे कधीतरी अकस्मातपणे यवतेश्वर घाटातील रस्ता खचला. घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस खाते आणि वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. खचलेला घाट अत्यंत अरुंद असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला. तसेच खचलेल्या भागाजवळ डोंगराची भिंत जेसीबीने खणून काढून रस्ता अधिक रुंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.   कासकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडय़ा सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकातच अडविण्यात आल्या. सकाळपासून शेकडो गाड्या परत पाठविण्यात आल्या. मात्र, दूर दूरवरून आलेल्या पर्यटकांनी 'बोगदा'मार्गे ठोसेघर किंवा सज्जनगडकडे जाण्याचा निर्णय घेतला. 'लोकमत'नं दिला होता वेळोवेळी धोक्याचा इशारा !यवतेश्वर घाटातील अनेक कठडे ढासळल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो, याची जाणीव 'लोकमत'मधून वेळोवेळी करून  देण्यात आली होती. मात्र ढासळलेल्या कठड्यांच्या जागी केवळ पांढरा रंग लावलेले दगड लावून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला गेला. कासला 'हेरिटेज'चा दर्जा प्राप्त झाल्यापासून लाखो पर्यटकांची पावले इकडे वळाली आहेत. या पार्श्वभूमीवर हा रस्ता अधिकाधिक रुंद अन् चांगला करण्याची गरज आहे.