शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

आमीरमुळे प्रशासन ‘ड्युटी’वर !

By admin | Updated: April 17, 2016 23:33 IST

‘वॉटर कप’ स्पर्धेची तयारी : सुटीच्या दिवशीही अधिकारी हजर

सातारा : राज्यातील जलसंधारण चळवळीला हातभार लावण्यासाठी सध्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या अभिनेता आमीर खानला साताऱ्यात सुखद अनुभव आला. रविवारची सुट्टी असतानाही ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने मंडलाधिकाऱ्यांपासून तलाठी, ग्रामसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत झाडून सगळे प्रशासन ‘ड्युटी’वर हजर असलेले पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मात्र, प्रशासनाची ही ‘कार्यतत्परता’ लोकप्रतिनिधींना रुचली नाही.‘सत्यमेव जयते’ व ‘पानी फाउंडेशन’च्या राज्यातील सातारा, अमरावती अन् बीड या तीन जिल्ह्यांत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामांत लोकसहभाग वाढावा म्हणून ‘वॉटर कप’ स्पर्धाही घेण्यात येणार आहे. कोरेगाव तालुक्यातील (जि. सातारा) ४० गावांतील ग्रामस्थ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेत पन्नास लाख (प्रथम), तीस लाख (द्वितीय) व दहा लाख (तृतीय) अशी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन भवनामध्ये ‘वॉटर कप’ या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्णातील मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमीर खान बोलत होते.या चाळीस गावांशिवाय जिल्ह्णामध्ये इतर ठिकाणीही जलसंधारणाची कामे व्हावीत, या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. स्पर्धेच्या माध्यमातून संबंधित गावामध्ये जलसंधारणाच्या कामाबरोबरच लोकांना पाणी अडविण्यासाठी प्रेरित करण्याचा मुख्य उद्देश या स्पर्धेचा आहे. आमीर खान म्हणाले, ‘या स्पर्धेत लोकांच्या श्रमदानातून केल्या जाणाऱ्या जलसंधारण कामाला अधिक महत्त्व दिले जाणार आहे. काम कशा पद्धतीने करायचे, यासाठी प्रत्येक गावातील पाच ग्रामस्थांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. कोणत्याही कामात नियोजन केले तर ते यशस्वी होतेच, त्यासाठी एकजूट हवी. मी काही मोजकेच चित्रपट करतो; पण जे करतो, ते मनापासून आणि परफेक्ट करतो, तसे तुम्हीही हे काम परफेक्ट करा,’ असे आवाहनही यावेळी आमीर खान यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना केले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्यासह इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रशासनाने अशीच तत्परता दुष्काळग्रस्त भागात दाखवावी‘रविवारी सुटी असतानाही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आमीर खान यांच्या बैठकीत ज्या उत्साहाने प्रशासन हजर झाले होते, तीच तत्परता दुष्काळी भागातील टँकर अन् छावण्यांसाठी दाखविली असती तर सध्याची भीषणता थोडीफार तरी कमी झाली असती,’ अशा भाषेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. -वृत्त/ हॅलो १बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्तरविवारी आमीर खान साताऱ्यात येणार आहे, हे कोणालाच माहिती नव्हते. नियोजन भवनाबाहेर पोलिसांचा ताफा दिसू लागल्यानंतर मात्र आत कोणीतरी सेलिब्रेटी असल्याची कुणकुण सातारकरांना लागली. त्यानंतर अनेक कार्यकर्ते आत जाण्यासाठी प्रयत्न करू लागले; मात्र, ‘लोकप्रतिनिधी असो वा पत्रकार, कोणालाही आत प्रवेश नाही,’ असे स्पष्ट करून पोलिस पथकाने सर्वांनाच बाहेर काढले.गेल्या दहा वर्षांपासून माझं साताऱ्याशी जवळचं नातं निर्माण झालं असून, आईच्या आग्रहाखातर मी पाचगणीत बंगलाही विकत घेतलाय. सातारा जिल्ह्यातील चाळीस गावांमध्ये आता काम करताना हीच आपुलकी खूप साथ देणार आहे. - आमीर खान, अभिनेता