शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरावरच्या झाडांना सलाईनद्वारे टाकाऊ बाटलीतून थेंब-थेंब पाणी.. गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:22 IST

उंब्रज : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत गेल्यावर्षी लावलेली झाडे करपू लागली आहेत. कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या डोंगरावरील साखरवाडी

अजय जाधव ।उंब्रज : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत गेल्यावर्षी लावलेली झाडे करपू लागली आहेत. कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या डोंगरावरील साखरवाडी याला अपवाद ठरले. तेथील युवकांनी भैरवनाथ देवस्थानच्या एक एकर जमिनीवर लावलेले शेकडो झाडे-फुलझाडे जगवण्यासाठी पाण्याच्या बाटल्यांचे सलाईन लावले आहे.

साखरवाडी हे कºहाड तालुक्यातील शेवटचे टोक असलेले गाव. गावाची लोकसंख्या अवघी चारशेच्या घरात. त्यातील निम्मे लोक उपजीविकेसाठी बाहेरगावी राहतात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे हे गाव दळणवळणाच्या सुखसोयीपासून लांब राहिले आहे. विधायक कामाच्या पाठीमागे सर्व ताकदीसह एकसंघ राहणारे गाव. गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीत हिरवाई फुलवावी. या कल्पनेतून ग्रामस्थ, युवक-युवतींनी निर्धार केला. उजाड माळरानावर गेल्या वर्षी वेगवेगळ्या जातींची झाडे, फुलझाडे लावली होती.

यामध्ये पिंपळ, वड, आंबा, चिंच, चिकू, लिंब, चंदन, बेल, सीताफळ, फायकस, बोगनवेल, आकाशी, चाफा, बकुळा यांची रोपे लावली. रोपे लावून समाधान न मानता ते जगविण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे.पावसाळ्यात पाण्याची कमतरता नसते; पण उन्हाळा सुरू झाला की येथे पाणी-पाणी करण्याची वेळ येते. पाण्याची कमतरता असूनही ही झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थ गाडीतून पाणी आणून या झाडांना देतात. असे पाणी आणणे, देणे हे खूप कष्टदायी आहे. हे युवकांच्या लक्षात आले. त्यांनी टाकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्या.

रिकाम्या बाटलीत पाणी भरले. या बाटल्याना छोटी छिद्रे पाडली. त्यानी या बाटल्या झाडांना अडकवल्या. त्यातून थेंब थेंब पडणारे पाणी ठिबकू लागले. हे पाणी झाडांच्या मुळापर्यंत पोहोचू लागले. गारवा निर्माण झाला. ही संकल्पना चोरे येथील गणेश गुरव, विजय भोसले, शुभम साळुंखे यांच्यासह युवकांनी राबवली आहे. ही झाडे बहरली उजाड डोंगरावर सावली निर्माण होईल.युवकांनी घेतली जबाबदारी...पाणी देण्याच्या या सलाईनच्या प्रकाराने झाडांना पाणी हळूहळू मिळत आहे. बाटलीमधील पाणी संपले तर बाटलीचे झाकण काढून पुन्हा पाणी भरले जात आहे. ही जबाबदारी युवकांनी घेतली आहे. रिकाम्या टाकाऊ पाण्याच्या बाटलीच्या माध्यमातून झाडे जगतील.ऱ्हाड तालुक्यातील साखरवाडीच्या डोंगरावर गेल्यावर्षी लावलेली झाडे जगविण्यासाठी सलाईनच्या बाटल्या बांधण्यात आल्या आहेत.