शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

पावसाळ्यातच दुष्काळ; शेतमजूर घायकुतीला...

By admin | Updated: August 26, 2015 21:20 IST

हाताला काम मिळेना : शेतकरीही चिंतेत; अनेकजण बांधकामाच्या मजुरीवर

कोपर्डे हवेली : ऐन पावसाळ्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्येक घटकावर जाणवू लागला आहे. ऐन पावसाळ्यात जिरायती क्षेत्रातील पिके करपू लागली आहेत. तर बागायती क्षेत्रातील दुष्काळाची परिस्थिती पाहून शेतकरी हवालदिल झाला असून, ऐन कामाच्या हंगामामध्ये शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट होत आहे. मजूर कामाच्या शोधात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जुलै आणि आॅगस्ट महिना पावसाचा म्हणून ओळखला जातो. पण या महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झालेल्या जिरायती क्षेत्रातील पिके करपू लागली असून, येत्या चार दिवसांत पाऊस नाही पडला तर हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. भुईमूग, घेवडा, सोयाबीन, हायब्रीड आदी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांचे शेंडे करपले आहेत. बागायती क्षेत्रामध्ये शेतीकाम करण्यासाठी मजुरांची टंचाई जाणवत असते; पण ऐन हंगामामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यात पाऊस पडेल की नाही, याविषयी शाश्वती नसल्यामुळे शेतात काम करण्यासाठी मजुरांचा खर्च वाचविण्यासाठी स्वत: काम करणे, भांगलणीचा खर्च वाचविण्यासाठी रासायनिक औषधांच्या फवारण्या घेणे आदी गोष्टींमध्ये वाढ केली आहे. तर पाऊस पडत नसल्यामुळे उसाची पाचट काढणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. भविष्यात पाणीटंचाई जाणवेल, या भीतीने उसाच्या लागणी बंद केल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात काटकसर करण्यासाठी मजुरांच्या कामामध्ये कपात करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना काम नाही, असेच चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. बांधकाम व्यवसायामध्ये काम शोधण्यासाठी पुरुषमंडळी फिरत आहेत. तर अनेक ठिकाणची बांधकामाची कामे गतवर्षीच्या तुलनेत बंद आहेत. त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम दिसू लागला आहे. हॉटेल, दुकानदार, पानपट्ट्या आदींना ग्राहक नसल्याने मोठा फटका बसला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेकजण दूध व्यवसाय करत आहेत. तर अनेकांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. वैरणीची टंचाई जाणवू लागल्याने शेळ्या तसेच म्हशींची विक्री सुरू आहे. (वार्ताहर) सर्वच घटकांवर परिणामशेतीत उत्पादीत होणाऱ्या माळव्याच्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात घट गावोगावच्या शेतमजुरांच्या हाताला कामच मिळत नाहीकऱ्हाड शहरासह मोठ्या गावांतील बाजारपेठेवर मंदीचे सावट पाण्याअभावी पिके वाळल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न प्रतिकूल हवामानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव जिरायती क्षेत्रासह बागायती क्षेत्रामधील विहिरी, बोअर यांची पाण्याची पातळी खालावली. पाण्याअभावी अनेक विहिरी कोरड्यासध्या दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. शेतामध्ये कामे नसल्याने हाताला काम नाही. अनेकजण मिळेल ते काम करून कुटुंब जगवित आहेत.- ज्ञानेश्वर काळे, शेतमजूर, कोपर्डे हवेली मी जिरायती भागातील शेतकरी आहे. सध्याच्या दुष्काळामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत. विहीर पाण्याअभावी कोरडी पडली आहे. पिके जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- आबाजी पोळ, शेतकरी, शामगाव