शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भीषण दुष्काळ !

By admin | Updated: September 4, 2015 00:14 IST

तलाव कोरडे : फलटण तालुक्यात २४ टक्के पाऊ स; राज्यकर्त्यांची मात्र पाठ

सातारा : मराठवाड्यात झाला आहे, तेवढाच किंबहुना कमी पाऊस यंदा सातारा जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे मराठवाड्याइतकेच भीषण दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर पसरले आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर तालुका वगळता इतर तालुक्यांत अगदी तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्मळून पडली आहेत. दुष्काळी भागातील तलाव कोरडे पडले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला असल्याने माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतराची वेळ आली आहे. याकडे राज्यकर्त्यांनी पाठ फिरविली आहे.माण, खटाव तालुक्यांत सध्या प्रचंड पाणीटंचाई झाली आहे. नाले, ओढे कोरेड पडले असून, पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीइतकाही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने बांधावर, माळरानावर गवतच उगवले नसल्याने चाराटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. फलटण तालुक्यात सर्वांत कमी ९४.६ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात पावसाची सरासरी ३८२ मि.मी. इतकी आहे. सरासरीच्या केवळ २४ टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. त्याखालोखाल कोरेगाव तालुक्यात १८०.४ मि.मी. म्हणजे सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला आहे. फलटण तालुक्यात तीव्र दुष्काळ जाणवत आहे. मात्र, फलटण तालुका कृषी अधिकारी यांनी टंचाई आढावा बैठकीत तालुक्यात चारा उपलब्ध असल्याचा अहवाल दिल्यामुळे चारा छावणी मिळण्याची आशा मावळली आहे. सध्या फलटण तालुक्यातील १४ गावांनी चारा मागणीसाठीचे निवेदन तहसील विभागाकडे दिले असून, ७ गावे व ७९ वाड्या-वस्त्यांवरील १२ हजार ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माण तालुक्यातील ४१ हजार १७, खटाव तालुक्यातील ४८ हजार ९७४, फलटण तालुक्यातील १६ हजार ४५९, कोरेगाव तालुक्यातील २८ हजार ४७५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्णपणे वाया जाणार असल्याने शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पावसाने अशीच पाठ फिरविली तर भविष्यामध्ये प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)कऱ्हाड तालुकाही कोरडा!पाऊसमानाचा तालुका म्हणून कऱ्हाड तालुक्याची ख्याती असली तरीही या तालुक्यात सरासरीच्या अवघा ३० टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली असली तरीही पुढील उन्हाळ्यात पाण्याच्या या तालुक्यालाही चटके सोसावे लागण्याची चिन्हे यानिमित्ताने दिसत आहेत.पावसाची पाच वर्षांतील तुलनात्मक आकडेवारीतालुकासरासरी २०१०२०११२०१२२०१३२०१४२०१५टक्केवारीसातारा९०८१०११ ७७७.६ ६८६११८२१०३४४०७४५%जावळी१६०३१५३०१७३७१२५८.८१७८७१६३८९६०६०%कोरेगाव६४२.६९०४४९७३६०५९६४७०१८०२८%कऱ्हाड६३२.१८७२५९३ ५५०५६९६६३१९५३०%पाटण१७३३१५१११८०४१५७४१५१० १५२५६६९३९%फलटण३८२ १०२८३४२२६७४६९४०७३८३ २४%माण४४२७६१२२५२६९४०७३८३१३५३३%खटाव४१५८१४३७३२७३५७४५५२१३५३२%वाई ७१०.३१९२९८७३६५० ८८१६७४२४३.३३४%महाबळेश्वर२२२३४२४४६४५६३९०८३८१२५६५०३०४३ १३७%खंडाळा४१६६६२४३३४५१६३३४८५४५११९५.२ %चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी धोक्यात खरीप हंगामातील पिकांना गरजेइतकाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावीरल पेरणी धोक्यात आली आहे. पश्चिम भागात उपलब्ध पाणीस्रोतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिके जगविली असली, तरी अपेक्षित उत्पादन होणार नाही. पूर्व भागातील पिके पावसाअभावी उन्मळून पडली आहेत.रब्बी हंगामही येणार अडचणीतखरीप हंगामच वाया जाण्याची चिन्हे असताना रब्बी हंगामातील पेरणी कशी होणार? याबाबत प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांपुढे आहे. गहू, ज्वारीची पिकेही कशी करायची याचे कोडे आहे. त्यातच बागायत पिकांचे तर स्वप्नच ठरणार आहे.