कऱ्हाड : ‘गत पंधरा वर्षांत उत्तरेतील जनतेला फसविण्याचा उद्योग करणाऱ्यांना पुन्हा आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत़ यंदा सुज्ञ मतदार त्यांचे स्वप्न साकार होऊ देणार नाही,’ असा टोला धैर्यशील कदम यांनी विद्यमान आमदारांना लगावला़किरोली, ता़ कोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोेलत होते़ कोरेगाव पंचायत समिती सभापती ज्योती भोज, भीमराव पाटील, प्रतिभा भोसले, संजना जगदाळे, विकास राऊत, जितेंद्र भोसले, नीलेश माने, सरपंच प्रतिभा जाधव, लक्ष्मण चव्हाण आदी मान्यवरांची उनस्थिती होती़ धैर्यशील कदम म्हणाले, ‘गेली तीन वर्षे पृथ्वीराज चव्हाणांनी मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर विकासकामे देण्याचा प्रयत्न केला आहे़ सामाजिक बांधिलकीतून लोकांचे वैयक्तिक प्रश्न सुध्दा सोडविण्याचा नेहमी प्रयत्न झाला आहे़’ कार्यक्रमास शिवाजीराव साळुंखे, तात्या साबळे, सतीश जाधव, शिवाजीराव साळुंखे, महेश उबाळे, अधिराज माने, विठ्ठल घाडगे, महिपत यादव, कल्याण घाडगे, उमेश जाधव, विठ्ठल बनकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
जनतेला फसवणाऱ्यांना पुन्हा आमदारकीची स्वप्न
By admin | Updated: July 23, 2014 22:31 IST