शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कबुतरे आकाशात सोडून शांतिदूत पुतळा बसविण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदुताचा पुतळा हटवल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लोकभावनेचा आदर करत होता त्याच जागेवर पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी संदीप पाटील यांच्यासह समस्त सातारकरांच्या वतीने १८ कबुतरे आकाशात सोडून पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामास प्रारंभ केला.पोलीस मुख्यालयासमोरील साताºयाचा लाडका शांतिदूत पक्षी गुरुवारी रात्री हटविण्यास सुरुवात केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदुताचा पुतळा हटवल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लोकभावनेचा आदर करत होता त्याच जागेवर पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी संदीप पाटील यांच्यासह समस्त सातारकरांच्या वतीने १८ कबुतरे आकाशात सोडून पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामास प्रारंभ केला.पोलीस मुख्यालयासमोरील साताºयाचा लाडका शांतिदूत पक्षी गुरुवारी रात्री हटविण्यास सुरुवात केली. हा पुतळा पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या इच्छेखातर कोल्हापूरला हलविण्यात येत असल्याचे समजताच सातारकांना धक्काच बसला. काहींनी पुतळा हटवण्याचे काम थांबवून ठिय्या आंदोलन केले. तसेच अनेकांनी पोलीस प्रशासनावर तीव्र टीका केल्यानंतर पोलिसांनी पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी तो पोलीस परेड मैदानात बसविण्यात येणार असल्याचे सांगितले.दुसºया दिवशी पुन्हा घुमजाव करत प्रशासकीय बाब म्हणून हा पुतळा मुख्यालयाच्या मागील बाजूस मैदानात बसविला जाईल, असे सांगण्यात आले. सातारकरांच्या आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत लोकभावनेचा आदर करत पुतळा होत्या त्या जागी बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी विविध संघटना आणि त्यांचे पदाधिकारी पोलीस मुख्यालयासमोर जमले. त्यांनी संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांच्यासह सातारकरांनी १८ कबुतरे आकाश सोडली. तसेच साखर, पेढे वाटून पोलिसांच्या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक करण्यात आले. येत्या काही दिवसांत हा शांतिदूत पुन्हा त्याच ठिकाणी बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.ढाबळीतून आणली अठरा कबुतरे...साताºयाचा लाडका पक्षी आझाद झाल्याचा संदेश देण्यासाठी शिंदे नामक एका सातारकराने कबुतराच्या ढाबळीतून १८ कबुतरे आणली होती. ती कबुतरे मुख्यालयासमोर शांतिदूत पुतळ्याच्या सुशोभिकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी पोलीस अधीक्षक व सातारकरांच्या हाती देऊन आकाशात सोडली.