शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शिपायाने कराची रक्कम उडवली मटका, जुगारात; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीच्या कारभारावर आक्षेप

By प्रगती पाटील | Updated: September 30, 2023 19:35 IST

दोषींवर कारवाई होण्यासाठी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन 

सातारा : नवनवीन उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या जकातवाडी ग्रामपंचायतच्या कारभारावर आता शंका घेण्यात येऊ लागली आहे. ग्रामपंचायतकडे करापोटी जमा होणारा पैसा चक्क मटका व जुगारापोटी उडवल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या शिपायावर करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई व्हावी या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्ते महेश शिवदास यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले आहे.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिवदास यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर आक्षेप नोंदवले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, 'जकातवाडी ता. सातारा येथील ग्रामपंचायत कर्मचारी यशवंत दळवी व संगणक चालक शुभांगी गुजर यांनी ग्रामपंचायतीच्या विविध करापोटी भरलेल्या रकम खात्यात न भरता ती स्वतः साठी वापरली. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुधीर कदम यांच्या सहमतीने हे केल्याचे निदर्शनास आले आहे.शिपाई नारायण दळवी यांनी मटका व जुगारापोटी तर संगणक चालक गुजर यांनी ग्रामपंचायतीचे पैसे वैयक्तिक खरेदीसाठी वापरले आहेत. शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतीला जमा होणारा भरणा सात दिवसात ग्रामपंचायतीच्या खात्यावर भरणे बंधनकारक असतो. या तिन्ही कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर हा भरणा उशिरा केला. तब्बल आठ ते नऊ महिने कराचे पैसे स्वतःकडे ठेवून शासनाची फसवणूक केल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.

असा उघडकीस आला प्रकारजकातवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपासून ग्रामस्थांचे काम ऐकणे जवळपास बंद केले होते. याविषयी सदस्यांनी चौकशी केल्यानंतर पगार न  झाल्याने काम करत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सदस्यांनी चौकशी केली असता मार्च २०२२ पासून ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये वसूल झालेली कराची लाखो रुपयांची रक्कम खात्यावर भरली नसल्याचे समोर आले.

ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून कर स्वरूपात जमा झालेली रक्कम चुकून भरायची राहून गेली. यातील काही रक्कम त्यांनी जुगारासाठी नव्हे तर कुटुंबियांच्या आजारपणासाठी वापरल्याचे स्पष्ट केले. वेळोवेळी सूचना दिल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी सर्व रक्कम ग्रामपंचायतच्या बँक खात्यावर भरण्यात आली. - सुधीर कदम, ग्रामसेवक, जकातवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत