शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

डबेवाडीत आता डॉल्बी न्हाय वाजणार

By admin | Updated: June 19, 2014 00:46 IST

ग्रामसभेत निर्णय : डॉल्बीमुक्त गाव झाल्यानंतर फटाके वाजवून जल्लोष

परळी : वरातीत नाचण्यावरून बुधवारी (दि. ११) विकास पवार यांचा किरकोळ कारणावरुन खून झाला होता. परंतु त्यानंतर गावात पुन्हा डॉल्बी वाजलीच न्हाय पाहिजे, यासाठी गावामध्ये ग्रामसभा घेऊन डॉल्बीमुक्त गाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने ग्रामस्थ खूष झाले आणि त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.गावात कोणताही आनंदाचा क्षण असल्यास त्या घरातील लोक डॉल्बी लावून आनंद व्यक्त करतात. कोणाच्या लग्नाची वरात असेल तर वरातीत डॉल्बी असतेच. वरातीत नाचणारे हौसे-नवसे पहिल्यांदा डॉल्बी आहे का, याची विचारणा करतात. मद्य पिऊन वरातीत नाचणे, हे तर आता नेहमीचेच झाले आहे. शेजारील गावात वरात असली तर काही हौशी मुले तिथे नाचायला जातात. असाच प्रकार बुधवार (दि.११) रोजी रात्री ११च्या सुमारास डबेवाडी येथील वरातीमध्ये घडला. बोगदा परिसरातील मंगळवार पेठेतील ट्रॅक्टरचालक विकास पवार (वय २६) यांचा ‘नाचायला चल की,’ या कारणावरुन मित्रांमध्ये झालेल्या वादात त्यांचा बळी गेला. त्यानंतर बोगदा आणि डबेवाडी या दोन्ही गटांमध्ये जोरदार वातावरण तापले. खून केला कुणी, का केला, कसा झाला याची काही कल्पना नसणाऱ्या डबेवाडी ग्रामस्थांना या प्रकरणाचा त्रास होऊ लागला. पाच दिवस संपूर्ण गाव दहशतीखाली राहिले आणि काहीही संबंध नसलेल्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.अखेर सोमवार (दि. १६) रोजी गावकऱ्यांनी ग्रामसभा बोलावली. त्या सभेला अध्यक्ष म्हणून सातारा तालुका पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांना बोलविण्यात आले. गावकऱ्यांना आपली गाऱ्हाणी सुरू केली. त्यानंतर गाव एका ठाम निर्णयावर पोहोचले. आजपासून गावात डॉल्बी न्हाय वाजली पाहिजे, असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. कोणी गावात डॉल्बी आणेल, त्याला पाच हजार एक रुपये दंड आणि संबंधितांची डॉल्बीसह पोलीस ठाण्यात रवानगी, असा ठाम निर्णय घेण्यात आला. या सभेस संपूर्ण डबेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. या निर्णयानंतर ग्रामस्थ खूष झाले. त्यांनी फटाके लावून आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)