येथील महिला महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ आणि समाजशास्त्र विभाग यांच्यातर्फे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. संजय कांबळे, उपप्राचार्य एस. टी. साळुंखे, प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. पांडुरंग साळुंखे म्हणाले, अनेकदा एम. फिल. किंवा पीएच.डी.सारखे संशोधन हे आर्थिक लाभाच्या दृष्टीने केले जाते. त्याऐवजी संशोधनातून समाजजीवनास कसा फायदा होईल, लाभ मिळेल, त्या पद्धतीचे संशोधन झाले पाहिजे.
प्राचार्य डॉ. संजय कांबळे म्हणाले, विद्यार्थिनींनी शालेय अभ्यासाबरोबरच समाजविकासासाठी योगदान दिले पाहिजे. लोकांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देण्याची जबाबदारी समाजातील सुशिक्षित आणि जागरूक वर्गाची असते, हे विद्यार्थिनींनी लक्षात ठेवले पाहिजे.
कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक, प्राध्यापिका, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. वंदना मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सूरज काकडे यांनी आभार मानले.
फोटो : ०४केआरडी०२
कॅप्शन : उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील महिला महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत प्रा. डॉ. पांडुरंग साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.