शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कऱ्हाडचा भूगोल बदलण्याचा प्रयत्न करू नका

By admin | Updated: July 16, 2015 00:06 IST

नगरसेवक आक्रमक : मलकापूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत संताप--कऱ्हाड पालिका सभा

कऱ्हाड : कऱ्हाडला अनेक शतकांचा इतिहास आहे. परंतु काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मलकापूरच्या सत्ताधाऱ्यांनी दादागिरी करून कऱ्हाड शहरातील मालमत्ता आपल्या हद्दीत ओढण्याचा सपाटा लावला आहे. कऱ्हाडचा भूगोल बदलण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पालिकेच्या विशेष सभेत नगरसेवकांनी दिला.ङ्कमलकापूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यावर सूचना व हरकती घेण्याबाबत कऱ्हाड पालिकेची विशेष सभा बुधवारी आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे होत्या. यावेळी नगरविकास विभागाचे सहायक संचालक श्रीकांत देशमुख, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे उपस्थित होते. ङ्कमलकापूर नगरपंचायतीकडून अंतिम मंजुरीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये कऱ्हाड शहरातील हद्दीतील एकूण २३ सर्व्हे नंबर मलकापूर हद्दीत दाखविल्याबद्दल सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनी प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव म्हणाले, ‘नगरविकास विभाग कऱ्हाड व मलकापूरसाठी वेगवेगळे निकष लावत असते. आम्ही कऱ्हाडच्या हद्दीतील एकही जागा मलकापूरला देणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटकप्रमाणे कऱ्हाड-मलकापूर वाद पेटवला जात आहे. कऱ्हाडामधील अनेक ठिकाणे मलकापूर हद्दीत दाखविण्यातयेते.’ लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले, ‘नगरविकास विभाग राजकीय दबावाला बळी पडल्याचे जाणवत आहे. आम्ही वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची दखलही घेतली जात नाही. मलकापुरातील सत्ताधाऱ्ऱ्यांची आलेली राजकीयङ्कमस्ती उतरवण्यातही आम्ही कमी पडणार नाही.’ अ‍ॅड.ङ्कमानसिंंगराव पाटील म्हणाले, ‘मलकापूरशी कऱ्हाड पालिकेने नेहमी सहकार्याचीच भूमिका ठेवली आहे. नगरविकास विभागाने मात्र कऱ्हाडला कधीच सहकार्य केले नाही. अनेकवेळाङ्कमागणी करूनही आजतागायत विकास आराखड्याचा नकाशाही पाहण्यास देण्यात आला नाही. आम्ही यापूर्वी १२ सर्व्हे नंबर मलकापूरला स्वेच्छेने दिले होते; परंतु आता मलकापूर आणखी २१७ कुटुंबे नगरपंचायतीत घेऊ पाहत आहे. उद्या ते दत्त चौकापर्यंतही आपली हद्द सांगू लागतील.’ नगरसेवकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचे तसेच कऱ्हाडमधील विकास आराखड्याचे नकाशे का दिले नाहीत, याबाबत चौकशीचेही आश्वासन देशमुख यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)राजकीय वजनाकडे नगर विकासचे पारडे झुकतेय!नगरसेवक विनायक पावसकर म्हणाले, ‘जिकडे राजकीय वजन अधिक तिकडे नगरविकास विभागाचे पारडे अधिक झुकताना दिसत आहे. कऱ्हाडचे गॅझेट मलकापूरपूर्वी प्रसिद्ध झाले असताना त्यांनी कऱ्हाडमधील मालमत्ता आपल्या हद्दीत दाखविल्याच कशा ? कऱ्हाडमधील महत्त्वाची ठिकाणे तोडून मलकापूरला जोडण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. नगरविकास विभागाचे नेहमीच मलकापूरला अधिक सहकार्य दिसून येत असते.’