शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
3
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
4
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
6
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
8
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
9
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
12
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
13
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
14
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
15
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
16
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
17
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
18
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
19
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
20
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

चारा, पाणी मिळत नसल्याची तक्रार नको; एकनाथ शिंदेंच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:12 IST

सातारा : ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती भयंकर आहे. त्यामुळे जनावरांना चारा आणि माणसांना पाणी देण्यासाठी ...

सातारा : ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती भयंकर आहे. त्यामुळे जनावरांना चारा आणि माणसांना पाणी देण्यासाठी प्रशासनाने तयार राहावे. चारा, पाणी मिळत नाही, अशी एकही तक्रार येता कामा नये,’ अशी सक्त सूचना बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच यावेळी त्यांनी खटाव तालुका दुष्काळात कसा येईल, हे अधिकाºयांनी पाहावे, असेही स्पष्टपणे सांगितले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत मंत्री शिंदे बोलत होते. माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर ही बैठक झाली. यावेळी आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, नरेंद्र पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, उपशहरप्रमुख शिवाजीराव इंगवले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याचा दुष्काळी दौरा केला. या तालुक्यांत जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न मोठा आहे. खटावमध्ये तर ठराविक काही गावे सोडली तर सर्वत्र पिके करपून गेल्याचे दिसून आले. दुष्काळी भागातील काही गावांत तर आठ-दहा दिवसांत जनावरांसाठी चारा द्यावा लागेल, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत सर्व गोष्टी तुमच्या हातात नाहीत; पण लोकांच्या मागणीची नोंद घेणे हे तुमच्याकडे आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी सतर्क राहून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा.’दरम्यान, या आढावा बैठकीत प्रामुख्याने कृषी, पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. जिल्ह्यातील विविध पाणी योजनांचीही माहिती मंत्री शिंदे यांनी घेतली. तसेच शेतकºयांच्या फळबागा जळू लागल्या आहेत. त्यासाठी काही करता येईल का, याविषयीही चर्चा झाली.टँकर वाढवावे लागतील...जिल्ह्णात चारा, पाणी आणि लोकांच्या हाताला काम हे महत्त्वाचे आहे. येत्या काही दिवसांत माण आणि खटाव तालुक्यात पाण्यासाठी टँकर वाढवावे लागतील, त्यासाठी प्रशासनाने आतापासून तयारी करावी. लोकांना दिलासा देण्यासाठी काम करावे, अशी सूचनाही मंत्री शिंदे यांनी केली.खटावचे पाचवेळा नाव...मंत्री शिंदे हे सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी त्यांनी प्रथम जिल्हाधिकाºयांच्या केबिनमध्ये अधिकाºयांकडून माहिती घेतली. त्यावेळी मंत्री शिंदे यांनी खटाव तालुका प्रथम दुष्काळात कसा बसेल हे पाहा, असे सांगितले. त्यानंतर दुसºया हॉलमध्ये अधिकाºयांबरोबर बैठक झाली. त्यावेळी प्रशासनाने काय काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती घेतली. त्यावेळीही तीन ते चार वेळा खटाव तालुका दुष्काळात कसा बसेल ते पाहा, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच याबाबत मी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. मुख्यामंत्र्यांशीही बोलणार आहे, असे सांगून दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी अधिकाºयांना राहण्याचे सूचित केले.जिल्ह्णात आठ महिन्यांचा चारा उपलब्ध...आढाव्यादरम्यान, अधिकाºयांनी जिल्ह्णात सुमारे आठ लाख पशुधन असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी आठ महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. तसेच कालवे असणाºया परिसरात चारा लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळी जनावरांसाठी चारा कमी पडणार नसल्याने अधिकाºयांनी सांगितले. तसेच यावेळी शिंगणापूर पाणी योजना आणि जिहे कटापूर, उरमोडी पाणी योजनेविषयीही माहिती देण्यात आली.