शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जैसी करनी... वैसी भरनी’; शिवेंद्रसिंहराजेंना सूट नाही -: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:38 IST

‘जैसी करनी वैसी भरनी, या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही, आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी सुद्धा याला ते अपवाद नाहीत, लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केल्याने आमच्या

ठळक मुद्देरामराजेच संभ्रम निर्माण करत असल्याची टीका

सातारा : ‘जैसी करनी वैसी भरनी, या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही, आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी सुद्धा याला ते अपवाद नाहीत, लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केल्याने आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही,’ असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.

उदयनराजेंनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना सर्वत्र दगाबाजी, दगा-फटका, धोका याचेच चित्रण डोळ्यांसमोर येत आहे, असा दाट संशय त्यांच्या एकंदरीत विधानावरून येतो. शिवेंद्रराजेंनी लोकसभा निवडणुकीच्या आधीची वक्तव्ये एकदा तपासावीत. ‘पवारसाहेबांनी आमदारांना विश्वासात घ्यावे, पवारसाहेब देतील तो उमेदवार मान्य असेल, पवारसाहेबांनी तिकीट दिले तरी उदयनराजेंचे काम करणार नाही, लोकसभेला उदयनराजेंचे कामच करणार, कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत,’ वगैरे तुमचे उद्गार तुम्ही विसरलेला नसणार किंवा तुम्ही मिशीवाल्यासोबत खाल्लेल्या चविष्ट मिसळीचा काही दिवसांनंतर आता तुम्हाला ठसका लागत असावा म्हणूनच कदाचित आता आमच्या प्रत्येक हालचालीविषयी तुम्हाला शंका उत्पन्न होत असावी.

जावळीत तुम्हीच उभी केलेली भूतं तुमच्या मानगुटीवर बसायला कमी करणार नाहीत, याची नोंद गांभीर्याने घ्या. तुमचा निशाणा, तुमच्याच करणीने निर्माण केलेल्या बागुलबुवांवर ठेवा, तुम्ही जे केले आहे तेच तुम्हाला दसपटीने परत मिळणार आहे, याची खूणगाठ पक्की बांधून त्यादृष्टीने वाटचाल करा. आपण सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातून मनोमिलनानंतर महाराष्ट्रातून दोन नंबरने निवडून आला होता. एक नंबरला अशोक चव्हाण आणि तीन नंबरला अजित पवार हे होते. इतके लीड दिवंगत भाऊसाहेब महाराजांच्यापासून कोणालाही मिळालेले नाही, हे विसरलात का?

लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही जाहीर सभेत आपणासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सहकार्य केल्याचे नमूद केले आहे. काही दिवसांनी कथित भगीरथ ऊर्फ भोगीरथ मात्र उदयनराजेंना जावळीत कमी मते मिळाली ते पाहा, असा आगंतुक सल्ला देतात, आपण तर म्हणता की सातारा-जावळीमध्ये मिळालेले मताधिक्य तुम्ही पक्षाशी प्रामाणिक राहून काम केल्याने मिळाले आहे, यावरून तुमच्या बाबतीत संभम्र कोण निर्माण करतंय, हे एकदा विचार करून ठरवा. ‘जैसी करनी वैसी भरनी,’ हा न्याय सर्वांनाच लागू आहे, असेही खा. उदयनराजे यांनी नमूद केले आहे.तिघे मिळून डिस्टर्ब करत असल्याची तक्रारआमदार शिवेंद्रराजे यांनी आमदार शशिकांत शिंदे, ॠषीकांत शिंदे आणि उदयनराजे असे तिघे मिळून डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार केली आहे. तसा उपद्रव करण्याचे नियोजन करण्यासाठी आमची कसली बैठक, मिटिंग, कोठे झाली आहे का? याचा खुलासा आमदार शशिकांत शिंदे यांनी करणे गरजेचे आहे, तसेच आमदार शिवेंद्रराजे यांनीही आमदार शशिकांत शिंदे यांना याबाबत विचारणा केली पाहिजे, असे मतही उदयनराजेंनी मांडले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसले