शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

४५८ पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सतरा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 12:58 IST

Muncipaltycarporation, Diwali, Padwidhar, elecation, sataranews सातारा पालिकेला कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी तब्बल ७७ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान द्यावे लागणार आहे. मात्र पदवीधर मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता साताऱ्यात लागू झाल्याने सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी दिली जाणार आहे.

ठळक मुद्दे४५८ पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सतरा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आचारसंहितेमुळे प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी मिळणार

सातारा : सातारा पालिकेला कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी तब्बल ७७ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान द्यावे लागणार आहे. मात्र पदवीधर मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता साताऱ्यात लागू झाल्याने सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी दिली जाणार आहे.आठवडाभरापूर्वी सातारा पालिकेतील दोन स्वतंत्र कर्मचारी संघटनांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन पंधरा आणि वीस हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात झालेल्या बैठकीस पालिका कर्मचारी संघाचे मार्गदर्शक अ‍ॅड डी .व्ही. पाटील यांच्या उपस्थितीत कर्मचारी शिष्टमंडळ व पालिका प्रशासनाची बैठक झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी अभिजित बापट यावेळी उपस्थित होती.

गतवर्षी दिवाळीला पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यापेक्षा जास्त अनुदान मिळावे, असा आग्रह कामगार शिष्टमंडळाचा होता. कोरोनाच्या काळात पालिका कर्मचाऱ्यांनी शहराची व्यवस्था सांभाळत रोग निर्मूलनाचे काम उत्तमरीत्या केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना समाधानकारक अनुदान देण्याची विनंती अ‍ॅड डी. व्ही. पाटील यांनी केली. चर्चेदरम्यान पंधरा ते वीस या दरम्यानचा मध्य काढून सतरा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा पालिका कर्मचाऱ्यांना सतरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची सूचना केली होती.

वित्त व लेखा विभागाला मंगळवारी बैठक होऊनही या संदर्भातील कोणताही लेखी आदेश मुख्याधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला नव्हता. सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सर्वसाधाण सभेत मंजूर करावयाचे नियोजन होते. मात्र, पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता जाहीर झाल्याने सर्वसाधारण सभा आणि त्याचा अजेंडा नियमात अडकला आहे . त्यामुळे सानुग्रह च्या प्रस्तावाला कार्योत्तर मंजूरी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीMuncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर