शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पारा उतरला

By admin | Updated: December 2, 2014 23:19 IST

थंडीची लाट : महाबळेश्वरला हिमकणांची प्रतीक्षा

सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन व थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा दिवसेंदिवस खालावत आहे. याठिकाणचे किमान तापमान १३ अंश सेल्सियसपर्यंत आले असून रात्रीच्या वेळी तापमानात अधिकच घट होत आहे. काही दिवसांत महाबळेश्वरात हिमकण दिसण्याची शक्यता असल्याने पर्यटकांमध्येदेखील कुतूहल वाढले आहे.जिल्ह्यात सर्वत्र थंडीचे प्रमाण वाढले असून प्रामुख्याने महाबळेश्वरमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर रोजी येथे १३ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या ठिकाणचा पारा आणखीनच उतरतो. त्यामुळे हिमकण पाहण्यासाठी येथे पर्यटकांची दरवर्षी गर्दी होते. महाबळेश्वरसह जिल्ह्यातील वाई, सातारा, खंडाळा अशा प्रमुख शहरांमध्ये सध्या थंडीची लाट पसरली असून, तापमान काही प्रमाणात खालावत आहे. याठिकाणी पहाटे व रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असून पारा १३ ते १४ अंश सेल्सियस पर्यंत उतरत आहे. (प्रतिनिधी)तालुक्यांचे किमान तापमान अंश सेल्सियसमध्येमहाबळेश्वर १३सातारा १४कऱ्हाड१४फलटण१४वाई१३खंडाळा१३पाटण१५कोरेगाव१४खटाव१४जावळी१३माण१५हिमणकांचे दर्शन लवकरच महाबळेश्वरमध्ये डिसेंबर महिन्यात पारा ४ अंश सेल्सियस पर्यंत उतरतो. यामुळे येथील दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. दवबिंदू गोठल्यानंतर त्यांचे हिमकणांत रूपांतर होते. सध्या थंडीचे प्रमाण पाहता येत्या काही दिवसांत महाबळेश्वरमध्ये हे चित्र दिसून येणार आहे.