सचिन काकडे - सातारा -उन्हाळा सुरू झाला नसला तरी जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सुमारे ५० टक्के तर माण, खटाव तालुक्यात काही ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील प्रमुख कोयना, धोम, उरमोडी, कण्हेर, भाटघर या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी असला तरी सद्य:स्थिती पाहता उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करणे हे व्यवस्थापनापुढे आव्हान आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहे. यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात आजमितीस ८३.३६ टीमएसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ७२.५९ टीएमसी इतका साठा होता.यावर्षी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने व्यवस्थापनापुढील अनेक अडचणी सुटल्या असल्या तरी गेल्या वर्षी उन्हाळ्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता विजेसह सिंचन व शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, खंडाळा, सातारा, कऱ्हाड, पाटण, दहिवडी या ठिकाणी सध्या पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र महाबळेश्वरला यंदा पावसाने सरासरीही न गाठल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत. फलटणमधील ६२ गावांत पाणीटंचाईजिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई फलटण तालुक्यात जाणवत आहे. तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. त्यापैकी ३६ गावे नीरा उजव्या कालव्याखाली येतात. धोम-बलकवडी कालव्यामुळे ३० गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. उर्वरित ६२ गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धोम-बलकवडी कालव्याचे काम पूर्ण झाल्यास याही गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. मात्र निधीअभावी कालव्याचे काम रखडले आहे. तालुक्यातील आंदरुढ, जावली, मिरढे, वडले, दुधेबावी, बोडकेवाडी, धुमाळवाडी, विंचुर्णी, मिरगाव आदी ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीही केली आहे. धरणे आणि साठवणक्षमता (टीएमसी मध्ये)धरणक्षमतासध्याचा पाणीसाठाकोयना१0५.२५८३.३६धोम १३.५0९.१३कण्हेर १0.१0७.६५उरमोडी ९.९६८.९३धोम-बलकवडी 0४.0८२.२२येरळवाडी १.१६०.५९माणमध्ये टँकरची मागणीमाण तालुक्यात असणारे सिमेंट बंधारे व तलावांत यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्याने याठिकाणी पाणीटंचाईची समस्या मिटली असली तरी इंजबाब, शंभूखेड व हवलदारवाडी याठिकाणी पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. ग्रामस्थांनी पाणी टॅँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. बिजवडी येथे नववर्षाच्या सुरुवातील पाणीटंचाई निर्माण झाल्याने याठिकाणी विहीर अधिग्रहण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जिल्हा पाणीटंचाईच्या दारात
By admin | Updated: January 14, 2015 00:33 IST