शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दहन, मोर्चा अन् घोषणांनी जिल्हा ढवळला

By admin | Updated: June 6, 2017 00:55 IST

दहन, मोर्चा अन् घोषणांनी जिल्हा ढवळला

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : सातारा, जावळी व वाई तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेल्या पाचवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व विविध शेतकरी संघटनांच्यावतीने शेतकऱ्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी महामार्ग रोखून धरत शासानाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून भाजपा सरकार विरोधात जोरदार निदर्शने व घोषणाबाजी करीत बंद यशस्वी करण्यात आला. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांकडून उडतरे येथे महामार्गावर टायर पेटवून वाहतूक अडविण्यात आलीतीन तालुक्यांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या पाचवड या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोरेगावचे आमदार शशिकांत शिंंदे, वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन समितीचा अहवाल, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीमालास हमीभाव याबाबत भाजप सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नाही, त्यांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे असे विविध अनुभव उपस्थितांपुढे मांडत आमदार शशिकांत शिंदे यांनी जाहीर निषेध करताच उपस्थित शेतकऱ्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करीत महामार्ग अर्धा तास रोखून धरला. दरम्यान उडतरे गावानजीक महामार्गावर शेतकऱ्यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजूला भलेमोठे टायर पेटवल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पाचवड येथे तैनात असलेला पोलिसांचा फौजफाटा ताबडतोब घटनास्थळी दाखल झाला व पेटलेले टायर महामार्गावरून बाजूला काढले. किसन वीर कारखान्याची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला.