शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस ‘व्हेंटिलेटरवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:00 IST

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मूत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज साडेआठ हजार लिटर पाण्याची ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मूत्रपिंडाचा विकार झालेल्या रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज साडेआठ हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे पाण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसलेल्या रुग्णांवर डायलेसीस केले जाते. एकावेळी १२ रुग्णांवर डायलेसीसची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. दहा ते बारा हजार रुपये खासगी रुग्णालयामध्ये मोजावे लागत असल्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये डायलेसीस करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे सिव्हिलमध्ये डायलेसीससाठी येणाºया रुग्णांची संख्या जास्त आहे. अतिदक्षता विभागामध्ये ज्या पद्धतीने रुग्णांवर उपचार केले जातात. त्याचपद्धतीने हाही विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.रुग्णांचे डायलेसीस करण्यासाठी रोज तब्बल साडेआठ हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची कमतरता झाली तर रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा पुरवठा योग्यरितीने होणे गरजेचे असताना सिव्हिलमध्ये मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याचा खेळखंडोबा सुरू आहे. जीवन प्राधिकरणकडून सिव्हिलला पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा आठवड्यातून चार ते पाचवेळा खंडित होत आहे. त्यामुळे डायलेसीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी चिंताग्रस्त होत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत झाला तर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिव्हिलमधील काही कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. मात्र, एकमेकांवर टोलवाटोलवी केल्यामुळे कधी- कधी पाण्याअभावी डायलेसीस मशीनचा वापर कमी प्रमाणात करावा लागत आहे. एका रुग्णांवर साधारण अडीच ते तीन तास डायलेसीस करावे लागते. मात्र, पाणी कमी असेल तर हे प्रमाण दीड ते दोन तासांवरही येते. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. या विभागात काम पाहणाºया टेक्निशियनला पाणी उपलब्ध झाले तरच रुग्णांवर डायलेसीस करता येते. रुग्णांची जबाबदारी या त्यांच्यावर असल्यामुळे पाण्यासाठी तळमळीने त्यांना याचना करावी लागत आहे.रुग्णांना मोफत पास..डायलेसीस रुग्णांना वारंवार रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे शासनाने रुग्णांना एसटीचा मोफत पास दिला आहे. रुग्णांची गैरसोय आणि मनोबल खचू नये, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. काही रुग्णांना एक दिवसाआड डायलेसीस करावे लागते तर काहींना आठवड्यातून एकदा डायलेसीस करावे लागते. अशांसाठी एसटीचा मोफत पास दिला जात असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले.