शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

कऱ्हाड पालिकेकडून रिक्षाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

कऱ्हाड : येथील पालिकेच्यावतीने राजेश शंकर कांबळे व विश्वास तानाजी बाबर यांना दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका ...

कऱ्हाड : येथील पालिकेच्यावतीने राजेश शंकर कांबळे व विश्वास तानाजी बाबर यांना दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सहकार्याने स्वयंरोजगारासाठी रिक्षाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, विदर्भ कोकण बँकेचे शाखाधिकारी मोहसीन शिरगुप्पे, सेल्स मॅनेजर माने उपस्थित होते.

या अभियानाचे व्यवस्थापक गीतांजली यादव, गणेश जाधव, समूह संघटक अंजना कुंभार, पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या विभागप्रमुख दीपाली रेपाळ, समुपदेशक प्रमोद जगदाळे उपस्थित होते.

अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी

मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

शामगाव घाटातील सुरक्षा कठडे ढासळले

शामगाव : येथील घाट अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. या घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शामगाव घाट एकेकाळी लूट, मारामारीसाठी बहुचर्चित होता. कालांतराने हे प्रमाण कमी झाले. मात्र, सध्या या घाटातील संरक्षक कठड्यांच्या वारंवार होणाऱ्या पडझडीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घाटातील संरक्षक कठडे तुटल्यामुळे काही सामाजिक संघटनांनी यावर आवाज उठवला होता. त्यानंतर पडझड झालेल्या कठड्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, मध्यंतरी वारंवार वाहनांच्या धडकेत कठड्यांची मोडतोड झाली आहे.

ढेबेवाडी मार्गावर धोकादायक वळण

कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळण आहे. या वळणांपैकी शिंंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. या वळणावर भरधाव वाहनांवरील चालकांचा ताबा सुटून वाहने नजीकच्या ओढ्यात जात आहेत. या ठिकाणी दिशादर्शक व सूचना फलक नाहीत. फलक लावण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनांमध्ये अपघात होत आहे.

ढेबेवाडी फाटा चौकात वाहतुकीचा बोजवारा

मलकापूर : ढेबेवाडी फाटा येथे वाहनचालक अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून, वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. ढेबेवाडी फाटा हे परिसरातील मध्यवर्ती केंद्र आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच वडाप वाहनेही याचठिकाणी थांबतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.