शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST

मायणी : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे तीन ...

मायणी : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोंडावर मायणीसह पश्चिम-उत्तर काही भागातील ग्रामस्थांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

याबाबत माहिती अशी की, येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून मायणी परिसरातील मायणीसह चितळी, गुंडेवाडी, मोराळे, व मरडवाक या पाच गावांसाठी पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मायणी प्रादेशिक नळ पाणी परवठा योजना सुरू करण्यात आली आहे. पाणी पुरवठा योजना सुरू केल्यापासून विविध कारणांमुळे ही योजना सतत बंद राहत होती.

दोन वर्षांपूर्वी या योजनेचे मोठ्या प्रमाणात लाईट बिल येत असल्याने व लहान गावांना योजना न परवडणारी असल्याने चितळी मोराळे गुंडेवाडी व मरडवाक या चार गावांनी या योजनेतील आपला सहभाग काढून घेतला. तेव्हापासून केवळ मायणी गावासाठी ही योजना कार्यान्वित होती. मात्र या योजनेवर असलेली शंभर हाऊस पॉवरची मोटर व त्याचे येणारे लाईट बिल व मायणी गावासही न परवडणारे आहे.

या योजनेचे थकीत वीज बिल ३ कोटी १२ लाखांचा आसपास गेले आहे. चार-पाच दिवसांपूर्वी मायणी ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागास २ लाख रुपये थकीत बिलापोटी भरले होते. मात्र थकबाकीची रक्कम मोठी असल्याने २ लाख भरल्यानंतर ही संबंधित विभागाने अधिक पैसे भरण्याची मागणी करत योजनेचा पुरवठा खंडित केला.

त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मायणीच्या पश्चिम व उत्तर भागातील लक्ष्मीनगर, सराटे मळा, चांदणी चौक परिसर मोराळे रोड मरडवाक रोड कचरेवाडीतील काही भाग या ठिकाणी या ठिकाणातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून वीज पुरवठा सुरळीत करून ऐन उन्हाळ्यात पाण्याची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चौकट

पर्यायी व्यवस्थाही अशक्य

सुमारे ३ कोटी रुपये प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. गत दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने थोडी रक्कम भरली आहे. तसेच नवीन योजना किंवा इतर पर्यायी व्यवस्था लगेच बघणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी आपला थकीत घरफळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सचिन गुदगे यांनी केले आहे.