शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवाद उफाळला, दाढोलीत पाटणकर-देसाई गट आमने सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 17:38 IST

दाढोली येथील जानाई देवी मंदिराच्या ओढ्यावरील साकवपुलाच्या कामावरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद उफाळला. शिवसेना कार्यकर्त्यांनी सदर कामाचे थेट भूमिपूजन केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

चाफळ : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारशीवरून मंजूरी मिळालेल्या चाफळ विभागातील दाढोली येथील जानाई देवी मंदिराच्या ओढ्यावरील साकवपुलाच्या कामावरून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद उफाळला. शिवसेना कार्यकर्त्यांनी सदर कामाचे थेट भूमिपूजन केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संबंधित कामाच्या ठेकेदारास धारेवर धरत सदर काम कोणी मंजूर केले व ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता काम कसे सुरू केले याबाबत विचारणा करत सदरचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. यामुळे येथील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते.दाढोली ग्रामपंचायतीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे वर्चस्व आहे. जानाईदेवी मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीवरून खा. श्रीनिवास पाटील यांनी सुमारे 30 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या कामाच्या भूमिपूजनाची तारीखही ठरविण्यात आली आहे. असे असताना देसाईगटाचे युवा कार्यकर्ते संभाजी डांगे यांनी गावातील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना सोबत घेवून खासदारांच्या प्रयत्नातून मंजूर कामाचे श्रेय घेण्यासाठी ठेकेदाराला हाताशी धरीत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांशिवाय परस्पर भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकण्याचा खटाटोप केला. मात्र हा प्रकार राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी जाग्यावर जाऊन सदरचे काम बंद पाडले.नुकत्याच झालेल्या जिल्हा बँके निवडणुकीतील गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या पराभवाने खचलेल्या विभागातील काही ज्येष्ठ नागरीकांनी नैराश्येतून दाढोली गावात वाद पेटवून दिल्याची चर्चा गावात सुरु आहे.

दाढोली ता.पाटण येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अथक प्रयत्नातुन मंजुरी मिळालेल्या साकव पुलाच्या कामाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक ठेकेदाराच्या संगनमताने करत आहेत. माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे मार्गी लागलेली आहेत. यापुढील काळातही अशीच विकास कामे केली जाणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी आम्ही मंजूर केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा जसाश तसे उत्तर दिले जाईल.   - प्रकाश पवार, माजी उपसरपंच, दाढोली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाई