शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

किळसवाण्या देहाला मिळाली ‘माणुसकीची झळाळी..’सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:30 IST

सातारा : अनेक वर्षांपासून पुलाखाली राहणारा एक तरुण, दाढी वाढलेली, केस वाढलेले, अंगभर कपडेही नव्हते. एखादा मनोरुग्ण वाटावा असेच

ठळक मुद्दे रवी बोडके यांच्यामुळे जगण्याची नवी आशा; चेहºयावरील हास्यामुळे मिळाले समाधान, शिरवळमधील पुलाखाली वास्तव्यसंबंधित तरुणाच्या चेहºयावरील हास्य पाहून समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा : अनेक वर्षांपासून पुलाखाली राहणारा एक तरुण, दाढी वाढलेली, केस वाढलेले, अंगभर कपडेही नव्हते. एखादा मनोरुग्ण वाटावा असेच त्याचे हावभाव. हा तरुण साताºयातील एका व्यक्तीच्या नजरेस पडला आणि त्याचे रंगरूपच बदलून गेले.शिरवळ येथील एका पुलाखाली एक तरुण गेल्या आठ वर्षांपासून वास्तव्य करीत होता. त्याचे केस वाढले होते. दाढीही वाढली होती. त्याच्या अंगात कपडेही नव्हते. पोटभर खायला मिळत नसल्याने तो शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झाला होता. साताºयातील यशोधन ट्रस्टचे रवी बोडके यांना शुक्रवार दि. १ रोजी या तरुणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने शिरवळगाठले.प्रथमदर्शी तो तरुण मनोरुग्ण असावा, असा भास रवी बोडके यांना झाला. मात्र, तो निराधार होता. त्या तरुणाची झालेली दयनीय व केविलवाणी अवस्था पाहून बोडके यांचे मन हेलावले. ते तातडीने त्या तरुणाला आपल्यासोबत घेऊन साताºयातील यशोधन ट्रस्टच्या निवारा केंद्रात आले.पोटभर जेवू, खाऊ घातल्यानंतर रवी बोडके यांनी तरुणाचे केस कापले, दाढी केली. त्याला स्वत:च स्वच्छ अंघोळ घातली. तसेच त्याला चांगले कपडेही दिले. आपले हे नवे रूप जेव्हा त्या तरुणाने आरशात पाहिले तेव्हा तो आनंदाने ढसाढसा रडू लागला. या तरुणाच्या चेहºयावरील हास्य पाहून मनाला समाधान लाभल्याचे रवी बोडके यांनी सांगितले.अनेक वर्षे न बोलल्यानं तोंडातूून शब्द निघेना...शिरवळ, ता. खंडाळा येथे आढळलेल्या संबंधित तरुणाने गेल्या सात ते आठ वर्षांपासून एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे त्याला बोलताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तरुणाला बोलते करण्यासाठी निवारा केंद्राचे सर्वच सदस्य प्रयत्न करीत असल्याचे रवी बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याचबरोबर संबंधित तरुणाच्या चेहºयावरील हास्य पाहून समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.ज्यावेळी या तरुणाला निवारा केंद्रात आणले, त्यावेळी त्याच्या शरीरावर अनेक जखमा झालेल्या पाहावयास मिळाल्या होत्या. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर सुदैवाने त्याला कोणताही आजार नसल्याचे स्पष्ट झाले. सध्या तो काहीच बोलत नसला तरी आम्ही त्याला लवकरच बोलते करणार आहोत. एका निराधाराला आधार देऊ शकलो याचाच खूप मोठा आनंद आता होत आहे.- रवी बोडके