शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

शस्त्रक्रियेवेळी वृद्धाचा डोळा निकामी

By admin | Updated: June 1, 2016 00:53 IST

कऱ्हाडातील प्रकार : डॉक्टरवर कारवाईची मनसेची मागणी

कऱ्हाड : मोतिबिंदू शस्त्रक्रिया करताना रक्तस्त्राव होऊन पाटण तालुक्यातील कुट्टे-पवारवाडी येथील एका वृद्धाचा डोळा निकामी झाला असल्याचा खळबळजनक प्रकार कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात घडला असून, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.रघुनाथसिंह पवार असे रुग्णाचे नाव असून, त्यांनी ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात डोळ्याने दिसत नाही म्हणून दाखवले होते. त्यावेळी त्यांना कऱ्हाड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. २८ एप्रिल रोजी पवार यांच्या डोळ्याची मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्यांच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. यावेळी संबंधित डॉक्टरांनी पवार यांना तत्काळ मिरज येथे पाठवून खासगी रुग्णालयात उपचार करून रक्तस्त्राव थांबविला. परंतु या शस्त्रक्रियेमध्ये पवार यांचा डावा डोळा निकामी होऊन त्यांची दृष्टी गेली आहे. या प्रकरणात शस्त्रक्रिया करणाऱ्या संबंधित डॉक्टरांचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून, दोषी डॉक्टरांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल, असाही इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. मनसेचे तालुकाध्यक्ष दादा शिंगण यांनी वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)