शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

माणूस संपवला तरी विवेकवाद वाढतोच आहे- डॉ. हमीद दाभोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 04:06 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम अत्यंत वेगाने पुढे सुरू आहे,’ असे दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

सागर गुजर सातारा : ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत. याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक झाली नाही, तोपर्यंत परिवर्तनाचा जागर करणाऱ्या लोकांना जीव तळहातावर घेऊनच काम करावे लागणार आहे. मात्र, माणूस संपवला तरी विचार संपत नसतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम अत्यंत वेगाने पुढे सुरू आहे,’ असे दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी, पुणे येथे हत्या झाली. त्यांना जाऊन सात वर्षे झाली, तरीदेखील त्या हत्येचे सूत्रधार अजूनही मोकाट फिरत असल्याचे शल्य डॉ. हमीद यांनी व्यक्त केले. संशयित आरोपी म्हणून ‘सीबीआय’ने २०१६ मध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, आॅगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहेत. अमोल काळे या संशयित आरोपींविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध देखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. हत्येमागील सूत्रधार कोण आहेत. हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे, असे मुलगी मुक्ता आणि डॉ. हमीद यांनी सांगितले. डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे व विवेकी समाजनिर्मितीचे काम जोमाने सुरू आहे.>राज्यव्यापी अभियानलातूर : अंनिसने २० आॅगस्टपासून ‘सुत्रधार कौन?’ हे राज्यव्यापी अभियान हाती घेतले आहे़ डॉ़ दाभोळकर यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने व गतीने व्हावा, असा अंनिसचा आग्रह आहे़ यावर्षी ‘सुत्रधार कौन?’ हे अभियान राबविले जात आहे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.