शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पडक्या घरातील आत्महत्या आठवड्याने उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/तांबवे : आठ दिवसांपूर्वी जेवण करून घराबाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह गावातीलच एका पडक्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. उत्तर तांबवे, ता. कºहाड येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील व्यंकट जाधव (वय २४) असे या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/तांबवे : आठ दिवसांपूर्वी जेवण करून घराबाहेर पडलेल्या युवकाचा मृतदेह गावातीलच एका पडक्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. उत्तर तांबवे, ता. कºहाड येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील व्यंकट जाधव (वय २४) असे या युवकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तांबवे येथील सुनील जाधव हा युवक अबोल स्वभावाचा होता. तो काही महिन्यांपासून तो पुण्यातील खासगी कंपनीमध्ये कामाला जायचा. मात्र, कामाला जाण्याबाबत तसेच कामावरून परत घरी येण्याबाबत तो नातेवाइकांनाकाहीच सांगायचा नाही. गावी आल्यानंतरही तो दिवसभर घराबाहेर असायचा. रात्री उशिरा घरी येऊन जेवण केल्यानंतर तो परत घराबाहेर पडायचा.त्याच्या घरापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर गावातीलच डॉ. हणमंत पाटील यांचे पडके घर आहे. या घरात सरपण तसेच अन्य शेतीकामाच्या वस्तू ठेवल्या जातात. सुनील रात्री घरातून बाहेर पडला की, या पडक्या घरात झोपायचा. त्यासाठी त्याने एक चादर, चटई आणि रग त्याठिकाणी आणून ठेवली होती. या घराला बाहेरून कडी, कुलूप असते. त्यामुळे सुनीलने घराच्या पाठीमागील भिंतीला येण्या-जाण्यासाठी भगदाडही पाडले होते.पंधरा दिवसांपूर्वी सुनील पुण्याहून गावी आला होता. सुमारे आठ दिवसांपूर्वी रात्री जेवण करून तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी तो घरी परत आला नाही. तो पुण्याला नोकरीच्या ठिकाणी गेला असेल, असे समजून कुटुंबीयांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला नाही.दरम्यान, शनिवारी सायंकाळी डॉ. हणमंत पाटील यांच्या पडक्या घरातून उग्र वास येत असल्यामुळे परिसरातील काही ग्रामस्थांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले. त्यांना घराच्या पाठीमागील भिंतीस भगदाड पडल्याचे दिसले. ग्रामस्थांनी आत जाऊन पाहिले असता त्यांना गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला.आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पोलिसांना माहिती दिली. .याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कºहाड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर, उपनिरीक्षक भापकर यांच्यासह कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. सुनीलच्या आत्महत्येचे कारण रविवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. याबाबतची नोंद कºहाड तालुका पोलिसांत झाली आहे.