शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

चाफळचे उत्तरमांड धरण भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:23 IST

चाफळ : कऱ्हाड - पाटण तालुक्याला वरदान ठरलेले चाफळ विभागातील गमेवाडी येथील उत्तरमांड धरण व वाघजाईवाडी येथील ...

चाफळ : कऱ्हाड - पाटण तालुक्याला वरदान ठरलेले चाफळ विभागातील गमेवाडी येथील उत्तरमांड धरण व वाघजाईवाडी येथील डेरवण पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्याव्दारे पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन गुरुवारी पहाटे ५ वाजता धरणाच्या सांडव्यावरुन २,५९० घ. फु. प्र. से. पाणी वाहू लागले आहे. नदीकाठावरील गावांमधील ग्रामस्थांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

गमेवाडी येथे उत्तरमांड धरण उभारण्यात आले आहे. तत्कालीन शिवसेना - भाजप युती शासनाच्या काळात सन १९९७मध्ये या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाला होता. गमेवाडी - नाणेगाव बुद्रुक गावच्या सरहद्दीवर उत्तरमांड नदीवर हा प्रकल्प साकारला आहे. संपूर्ण चाफळ विभागासह कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी, चरेगाव, भवानवाडी, उंब्रज परिसरातील वाड्या - वस्त्यांना वरदान ठरलेल्या गमेवाडीनजीकच्या उत्तरमांड मध्यम प्रकल्पात ६९३.७० टीएमसी पाणीसाठा झाला असून, सांडव्यावरुन २,५९० घ. फु. प्र. से. पाणी वाहू लागले आहे.

दरम्यान, जलाशयातील पाणीसाठा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सन १९९७मध्ये सुरु झालेल्या उत्तरमांड प्रकल्पाचे काम सध्या पूर्णत्वास गेले आहे. एक हजार ४२० मीटर लांब व ४४.४५ मीटर उंच असलेल्या या जलाशयात ६८३ मीटर जलसंचय पातळी आहे.

या प्रकल्पात तब्बल ६२५ एकर जमीन बाधित झाल्याने नाणेगाव, माथणेवाडी येथील ग्रामस्थांना विस्थापित व्हावे लागले आहे. धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या पिचींगसह सांडव्यातील पंधरा मीटर उंचीच्या भिंतीचे काम पूर्ण केले आहे. पुराचे पाणी सोडण्यासाठी दगडी बांधकामाच्या सांडव्यावर १२×४ मीटर आकाराचे तीन वक्र दरवाजे बसवले आहेत. परंतु, माथणेवाडीकरांचे पुनर्वसन रखडल्याने धरणात एक टीएमसीही पाणीसाठा करण्यास प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. धरणात १ टीएमसी पाणीसाठा करण्यात येणार आहे. मात्र, तो नक्की कधी व कोणत्या साली होईल, हे सांगता येणार नाही. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी आजही विस्थापितांचे प्रश्न प्रलंबित आहेत.

चौकट :

डेरवण तलावही पूर्ण क्षमतेने भरला

वाघजाईवाडीजवळ असणारा डेरवण पाझर तलाव गत महिन्यात पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरला आहे. याही तलावाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तलाव ओव्हर फ्लो झाला होता. यावर्षी मात्र तो जूनच्या शेवटी एक महिना अगोदरच भरुन वाहू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.