शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कास मार्गावर ऐन परीक्षेत एसटीअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 12:43 IST

सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात सोमवारी सकाळी रस्ता खचल्याकारणाने संध्याकाळपासून एकेरी  वाहतूक  सुरू करण्यात आली आहे. परंतु ‘लाईट व्हेईकल’ या मार्गावरून जात असली  तरी  रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय जड वाहने व एसटी बसेसची या मार्गावरून वाहतूक सुरू होणार नाही. यामुळे सातारा-कास-बामणोली मार्गावर अनिश्चित वेळेपर्यंत एसटी बसचे दर्शन दुर्मीळ राहणार आहे. तसेच यामुळे ऐन परीक्षेत एसटीअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना पासअभावी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

ठळक मुद्देपास असूनही आर्थिक भुर्दंड यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने एकेरी वाहतूक  घाटातील रस्ता खचल्याने एसटी बसेस बंद प्रवाशांना शोधावे लागत आहेत अन्य पर्याय

पेट्री, 5 : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात सोमवारी सकाळी रस्ता खचल्या कारणाने संध्याकाळपासून एकेरी  वाहतूक  सुरू करण्यात आली आहे. परंतु ‘लाईट व्हेईकल’ या मार्गावरून जात असली  तरी  रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय जड वाहने व एसटी बसेसची या मार्गावरून वाहतूक सुरू होणार नाही. यामुळे सातारा-कास-बामणोली मार्गावर अनिश्चित वेळेपर्यंत एसटी बसचे दर्शन दुर्मीळ राहणार आहे. तसेच यामुळे ऐन परीक्षेत एसटीअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना पासअभावी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

        शहराच्या पश्चिमेकडे  ग्रामीण भागात दळणवळण व वाहतुकीसाठी एसटी बस हेच मुख्य साधन आहे. परंतु या मार्गावर एसटी बसची चाके थांबल्याने बसच्या बामणोली, तेटली, गोगवे, वांजळवाडी, चिकणवाडी या गावांच्या मिळून दिवसभराच्या एकूण पूर्ण आठ फेºया रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे.

         या भागातील बहुतांशी लोक रोजगारानिमित्त पुणे-मुंबई येथे असल्याने दिवाळीसह सणासुदीला आपल्या मूळगावी  काही  दिवस  सुटीवर येतात. परंतु ऐन दिवाळी तोंडासमोर  आली  असताना  घाटातील रस्ता खचल्याने एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांना अन्य पर्याय शोधावे लागत आहेत.

       बसेस बंद असल्याने नोकरदार वर्गाची धांदल उडत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दूर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. तसेच शहराच्या पश्चिमेकडील यवतेश्वर, अनावळे, पेट्री, कास, बामणोलीसह आसपासच्या गावांतील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी साताºयाला जातात. 

यवतेश्वर, सांबरवाडी, कास परिसर येथून पेट्री हायस्कूलला व कास, फळणी येथून अंधारी हायस्कूलला तसेच बामणोली, तेटली येथून बामणोली व आपटी हायस्कूलला तसेच कुसुंबी मुरा हायस्कूलला येणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बहुतांशी विद्यार्थ्यांचे पास असून, एसटीअभावी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

दरम्यान, पास असताना देखील इतर वाहनांना पैसे देत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करत किमान मिनी बस तरी सुरू करण्याची मागणी पालक, विद्यार्थी, ग्रामस्थांतून होत आहे.प्राथमिक स्वरुपाच्या कामाला प्रारंभ...      सोमवारी सकाळी रस्ता खचल्याची घटना यवतेश्वर घाटात घडली. सध्या कास-बामणोलीकडे जाण्यासाठी ‘लाईट व्हेईकल’ची एकेरी वाहतूक जरी सुरू असली तरी कित्येक पर्यटक मनात भीती धरून या घटनास्थळाच्या अलीकडे उतरून शंभर मीटर अंतर चालून जाताना दिसत आहेत. दरम्यान, या घाटाचे  प्राथमिक स्वरूपात काम सुरू झाले आहे.