शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Lok Sabha Election 2019 आघाडी धर्मावरून काँग्रेसमध्ये मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:32 PM

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात काँगे्रस पक्षाची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. या परिस्थितीत पक्षाचा स्वाभिमान ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात काँगे्रस पक्षाची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. या परिस्थितीत पक्षाचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी माण तालुक्यातील काँगे्रसचे शिलेदार सरसावले आहेत. काँगे्रस कुणाच्याही दावणीला न बांधता आघाडीधर्म पाळण्याचा ठाम निर्णय या शिलेदारांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे. काँगे्रस आमदार जयकुमार गोरे यांच्या नेमकी उलटी भूमिका काँगे्रसचे तालुकाध्यक्ष एम. के. भोसले यांनी घेतलेली दिसत आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात काँगे्रस-राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांची पुन्हा आघाडी झाली आहे. या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी समजुतीने जागा वाटपाचा निर्णयही घेतला. जागा वाटपात सातारा व माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँगे्रसला मिळाले आहेत. जिंकून येण्याची क्षमता आणि मतदार संघात ज्या पक्षाची ताकद मोठी आहे, त्याच पक्षाला जागा वाटपात सोयीस्करपणे जागा सोडली जात असते.माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षा पक्षाने राष्ट्रीय काँगे्रसचे साताऱ्याचे माजी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीमुळे काँगे्रसचे नुकसान झाल्याचा आरोप करत काँगे्रसचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा प्रचार करण्याचे जाहीर केले आहे.साताºयाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्य त्यामुळे काँगे्रसचे नेतृत्त्व रिते झाले. काँगे्रसचे जिल्ह्यातील बाहुबली नेते भाजपच्या कळपात जाऊन बसले. इतकेच काय वाईचे माजी आमदार मदन भोसले हे भाजपमध्ये गेल्याने जबर मोठा धक्का राष्ट्रीय काँगे्रसला बसला.या सर्व राजकीय उलथापालथीत काँगे्रस पक्षाची भलतीच पडझड झाली. एका बाजूला भाजप-शिवसेनेचा वारू रोखण्याचे आव्हान असताना काँगे्रसमधून विद्यमान आमदारच भाजप उमेदवाराचा प्रचार करायला निघाले. राष्ट्रवादीत जाऊ नका...असं म्हणत शेखर गोरे हेही भाजपच्या प्रचारात उतरले.ही परिस्थिती एका बाजूला असताना काँगे्रसचा स्वाभिमान जागृत करण्याचे काम माण तालुक्यातील काँगे्रसचे पदाधिकारी करत आहेत. काँगे्रसचे माण तालुकाध्यक्ष एम. के. भोसले यांनी काँगे्रसची पडझड रोखण्याचे काम हाती घेतले आहे.काँगे्रसची फरफट रोखण्यासाठी पुढाकारराष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करून केंद्रात राहुल गांधी यांचे हात मजबूत करण्याचा विचार यामागे आहे. गोरे बंधूंचे मोठे आव्हान पुढे दिसत असतानाही काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही काँगे्रसजणांना दिलासा देणारी ठरली आहे. त्यातच कुणा एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार तालुक्यातील पदाधिकारी फरफटत जाणार नाहीत, हा संदेशही भोसले यांनी यानिमित्ताने दिला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक